प्रतिनिधी : शितल भगत पुणे जुन्नर : ता. 22 एप्रिल साई कला आविष्कार नाट्य संस्था ,भोसरी व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आणि को...
प्रतिनिधी : शितल भगत
पुणे जुन्नर : ता. 22 एप्रिल
साई कला आविष्कार नाट्य संस्था ,भोसरी व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुप, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी वर्गात चित्रकलेची आवड निर्माण व्हावी. कलासक्त नागरिक घडावे. या उद्देशाने दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न होते. या तेराव्या वर्षी चंद्रयान -3 या विषयावर ही रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. पंधरा हजार विद्यार्थी वर्गाने सहभाग घेतला. संस्थेच्या वतीने प्रत्येक सहभागीना फोर कलर आकर्षक सन्मानपत्र देण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका व कलाशिक्षक कलाशिक्षिका यांना सुंदर स्मृतीचिन्ह देऊन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शालेय स्तरावर तीन क्रमांक काढण्यात आले. त्यांना सन्मानपत्र , गोल्ड मेडल देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते समारंभ पूर्वक गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक बसवराज कल्लोळी, माजी सीनियर मॅनेजर टाटा मोटर्स रमाकांत आडके, मराठी विभाग प्रमुख महात्मा फुले महाविद्यालय प्राध्यापक डॉ. प्रा. पांडुरंग भोसले, मॉर्डन महाविद्यालय पुणे प्रा.डॉ.रुपेश बनसोडे,
जयहिंद इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य डॉ.किरण पैठणकर इ. मान्यवर उपस्थित होते.
"सवय लागणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या प्रयोगातून शास्त्रज्ञ घडत असतो. आपल्या प्रत्येकात एक शास्त्रज्ञ बनण्याची क्षमता आहे. देशाच्या विकासामध्ये आपली बौद्धिक कौशल्य, ज्ञान, शिक्षण उपयोगात आणणे आवश्यक आहे. परिश्रमाने यशाकडे कडे जाता येते, विद्यार्थी वर्गात अशा उपक्रमामुळे विज्ञानवादी दृष्टिकोन वाढण्यास मदत होत आहे. भविष्यातील अनेक शास्त्रज्ञ या कार्यक्रमातून घडणार आहे. अशी आशा आहे. मुलांच्या सुप्त कलागुणांचा विकास करण्याची जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारताचे संशोधनामध्ये भविष्य उज्वल आहे. मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या सोबतच्या आठवणी सुद्धा यावेळेस सांगण्यात आल्या."आपल्या मनोगतात शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांनी यावेळीआपली भूमिका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे इतर ही मान्यवरांनी विद्यार्थी वर्गास मार्गदर्शन केले.
या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत ता . जुन्नर शाळेने सहभाग घेतला होता 32 विद्यार्थी सहभागी होते
साई कला आविष्कार नाट्य संस्था पुणे यांनी शाळा पातळीवर काढले क्रमांक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत
१) श्रुती निलेश डोके इ ३री ..प्रथम क्रमांक मेडल व सन्मानपत्र
२) आराध्या गणेश भास्कर इ ४थी .. व्दितीय क्रमांक मेडल व सन्मानपत्र
३) देवांश अंकुश डोके... तृतीय क्रमांक मेडल व सन्मानपत्र
४ ) निहाल असलम इनामदार.. तृतीय क्रमांक मेडल व सन्मान पत्र
श्याम सर कलाशिक्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र
यशवंत घोडे सर मुख्याध्यापक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र
तसेच सर्व सहभागी विद्यार्थींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर विजयी व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष असलम इनामदार व सर्व सदस्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.विजयी व सहभागी विदयार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
COMMENTS