प्रतिनिधी : शितल भगत जुन्नर: कुमशेत ता. 20 एप्रिल आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे शाळापूर्व तयारी मेळावा व चौथीच्या विद्यार्थ्यांच...
प्रतिनिधी : शितल भगत
जुन्नर: कुमशेत ता. 20 एप्रिल आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे शाळापूर्व तयारी मेळावा व चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे सन 2024-25 शैक्षणिक वर्षांमध्ये पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला गेला .
सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली, शालेय परिसरात रांगोळी काढून सजावट करण्यात आली.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमशेत गावचे विद्यमान सरपंच मा.रविंद्र डोके हे होते.पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांचे आनंदमयी उत्साही वातावरणात पहिले पाऊल पुस्तक ,फेटा ,गुलाब पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थीचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर शाळापुर्व तयारी अभियान उपक्रमाच्या अनुषंगाने
वेगवेगळे स्टॉल उभारण्यात आलेले होते त्यामध्ये नोंदणी पत्रक भरणे ,शरीरिक विकास, बौद्धिक विकास सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी अशा प्रकारे स्टॉलची मांडणी केली होती त्यानुसार विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्यात आल्या सर्व बालकांनी उत्साहात कृती पूर्ण केल्या.
त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळेतील अनुभव सादरीकरण केले.
पालकांची मनोगत झाले
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमशेत गावचे सरपंच रवींद्रभाऊ डोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
आर्या वैभव डोके हिने सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष असलम इनामदार, ग्रा.पं.सदस्य पत्रकार राजेश डोके, शा.व.स.अनिल डोके, मा.अध्यक्ष वैभव डोके,कृ.सं.सो.स.शिवाजी डोके, तंटामुक्ती उपाध्यक्ष गणेश डोके, मा.चेअरमन हिरामण डोके मा.अ.शा.स.विठ्ठल डोके,शा.व्य.स.चेतन भगत, पांडुरंग डोके,निलेश डोके, मंगेश डोके,सौ.संगिता डोके, सोनाली डोके
यशवंत घोडे सर,श्याम सर,अंगणवाडी ताई सौ. सुलोचना डोके, स्वयंसेवक विद्यार्थी,,माता पालक लिडर माता व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवटी आराध्या भास्कर हिने आभार मानले. गोड जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS