मुंबई : वेस्टर्न रेल्वे ऑल इंडिया एसी एसटी असोसिएशनच्या वतीने चर्चगेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली यावे...
मुंबई : वेस्टर्न रेल्वे ऑल इंडिया एसी एसटी असोसिएशनच्या वतीने चर्चगेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार अंबिकर Dy CEF प/रेल्वे, सतीश वासनिक निवेदक अकाऊंट अँड ऑडिट भारत सरकार, रामप्रसाद बी Dy CPO प/रेल्वे, ओ. पी. बैरवा झोनल सचिव एसी/ एसटी असोसिएशन प/रेल्वे, डी. एस. वाळके Rtd DSTE या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय कवी डॉ. खंडू माळवे यांनी दीप प्रज्वलन व बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच संजय अम्मुलकर यांनी प्रस्तावना मांडली. सर्वांनी सामुदायिकरित्या त्रिशरण आणि पंचशील घेतले. सुरेन्द्र साखरे मुख्य निरीक्षक प/रेल्वे यांनी यावेळी बुद्धगीत सादर केले व आपले विचार मांडले. विशेषतः संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणे हा मूळ उद्देश यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या मनात होता. यानंतर उपस्थित सर्वांचे स्वागत करून संविधानाच्या उद्देशिकेचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त केक कापून आगळा वेगळा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संजय अमुलकर, विकास शिंदे, सुरेंद्र साखरे, जयकुमार सिनोरिओ, विजय बनसोडे, विनोद बोरकर, सुधाकर बिरहाडे, अभिजीत रोकडे, उदय कांबळे, अनिल जाधव, प्रमोद खरात, सुनील आढाव, किशोर सोरटे, संदेश गायकवाड, महेश मोहिते, अमोल नांदेश्वर, सुरेश जैसवार, बी. एल. बैरवा , एम के गौतम, सूर्यकांत भारती, महेंद्र लांजेवार, सुधीर चौधरी, संजय रामटेके, रघुनंदन सिंग, संतोष गमरे, रामचंद्र सोनंवणे, संदीप भालेराव, अंकुश चव्हाण, श्याम कांबळे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास शिंदे यांनी केले. तर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करून शेवटी संविधानाची प्रस्तावना देत कार्यक्रम संपन्न झाला.
COMMENTS