प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) आज सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी मढ, ता. जुन्नर, जि. पुणे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्र...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
आज सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी मढ, ता. जुन्नर, जि. पुणे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी १२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, तीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले.
गेल्या पाच महिन्यात डिसेंट फाउंडेशन, शंकरा आय हॉस्पिटल, तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व जेष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने एक हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या असल्याचे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे , प्रवास, निवास, नाश्ता, जेवण हे सर्व मोफत असून, एका महिन्याची औषधे देखील मोफत दिली जातात. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण यांनी उपस्थितांना केले.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य महेंद्र सदाकाळ, शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डॉ. दिव्या देवी, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मस्करे, सचिव मुरलीधर मोढवे, पोलीस पाटील नारायण मस्करे, गणपत मस्करे, गणेश मेहेर, तपासणी तज्ञ सिद्धी मोरे, सपना शर्मा, नियती शिंदे, समृद्धी जंगम, विश्वनाथ पाटील, अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिर यशस्वी होण्यासाठी मढ, तळेरान, सितेवाडी व पारगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघांनी प्रयत्न केले .
COMMENTS