प्रतिनिधी : प्रा.सतिश शिंदे जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाची सहविचार सभा नुकतीच येडेश्वर विद्यालय येडगाव तालुका जुन्नर येथे संप...
प्रतिनिधी : प्रा.सतिश शिंदे
जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाची सहविचार सभा नुकतीच येडेश्वर विद्यालय येडगाव तालुका जुन्नर येथे संपन्न झाली या सभेमध्ये नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रवीण ताजने सचिव म्हणून प्रकाश जोंधळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे माजी अध्यक्ष रतिलाल बाबेल व जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वागदरे यांनी दिली.
सदर सभेसाठी जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वागदरे, सचिव अशोक काकडे, विज्ञान अध्यापक संघाचे माजी अध्यक्ष रतिलाल बाबेल ,उपाध्यक्ष वाय बी दाते,सचिव टी आर वामन आदी सह जुन्नर तालुक्यातील बहुसंख्य विज्ञान व गणित शिक्षक उपस्थित होते
सर्वानुमते नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष - प्रवीण ताजणे,
सचिव - प्रकाश जोंधळे,
उपाध्यक्ष- ज्ञानेश्वर केंद्रे व प्रशांत शेटे,
सहसाचिव - तुषार आहेर व.सोमनाथ सोनवणे
खजिनदार - बी .के नलावडे व .व्यंकट मुंढे
जिल्हा प्रतिनिधी- संजय कुटे व सुरेश कसार,
तालुका समन्वयक - प्रमोद जाधव व योगेश शेळके .
पुरुष सदस्य :- गवते एस एस, दिलीप लोंढे, ज्ञानेश्वर सस्ते, अविनाश शेटे, विरेंद्र काळे
महिला सदस्या - तेजल वायाळ, उज्वला खाडे, सविता ताजणे, संगीता गाडेकर , रुपाली आवारी, साधना जुन्नरकर
मार्गदर्शक - जे के सोळंकी, वल्लभ शेळके, महेंद्र गणपुले , रतीलाल बाबेल , वामन टी आर,
दाते वाय बी
COMMENTS