प्रतिनिधी : प्रा.सतिश शिंदे समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे यांच्या वतीने जुन्नर तालुका विज्ञान व गणित...
प्रतिनिधी : प्रा.सतिश शिंदे
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे यांच्या वतीने जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाच्या नूतन कार्यकारणीचा शाल व पुष्पगुच्छ देऊन नुकताच सन्मान करण्यात आला.
जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण ताजणे,उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर केंद्रे व प्रशांत शेटे,सचिव पदी प्रकाश जोंधळे,सोमनाथ सोनवणे व तुषार आहेर यांची सहसचिवपदी,बी.के.नलावडे व व्यंकट मुंढे यांची खजिनदार पदी,जिल्हा प्रतिनिधी म्हणून संजय कुटे व सुरेश कसार तर तालुका समन्वयक म्हणून प्रमोद जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रा.रतिलाल बाबेल यांनी दिली.तसेच जुन्नर तालुका विज्ञान व गणित संघाचे नवनिर्वाचित सदस्य रुपाली आवारी,संगीता गाडेकर,अविनाश शेटे,विरेंद्र काळे या सदस्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इयत्ता सहावी पासून व्यावसायिक शिक्षण येत असून विद्यार्थी व शिक्षकांना सक्षम करण्यासाठी समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बेल्हे सारख्या अनेक संस्थांशी माध्यमिक शाळांना जोडण्याची गरज आहे.जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.समर्थ संकुलाला दोन पेटंट प्राप्त झाले असून तालुक्यातील शिक्षकांसाठी समर्थ परिवाराने पेटंट कार्यशाळा घ्यावी तसेच ग्रामीण भागात विज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी समर्थ संकुलाने पुढाकार घ्यावा असे मत माजी अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी मांडले.
तत्परता दाखवून आम्हा नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केल्याबद्दल जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आपला ऋणी आहे.तालुक्यातील सर्व शाळांमध्ये वैज्ञानिक विचार पोहोचविण्यासाठी गेली दहा वर्षात समर्थ संकुलाने जी भूमिका बजावली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रकल्प राष्ट्रीय पातळी पर्यंत गेले आहे असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण ताजणे यांनी सांगितले.
विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने अनेक वर्षापासून विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले जात आहे.ही विज्ञानाची चळवळ याहिपुढे अखंडपणे सुरू राहील व त्यासाठी समर्थ शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,क्रीडा संचालक एचपी नरसुडे,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी सर्व नवनिर्वाचित जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघातील कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार प्रकाश जोंधळे यांनी मानले.
COMMENTS