आंबेगाव तालुक्यातील साकोरे गाव या ठिकाणी दलित समाजाच्या वस्तीत समाज मंदिर असताना गेल्या २० वर्षापासून ग्रामपंचायत ने समाज मंदिर चा वापर गोडा...
आंबेगाव तालुक्यातील साकोरे गाव या ठिकाणी दलित समाजाच्या वस्तीत समाज मंदिर असताना गेल्या २० वर्षापासून ग्रामपंचायत ने समाज मंदिर चा वापर गोडाऊन म्हणून केले जात आहे. दलित समाजाला त्यांचा काही उपयोग करून देत नाही अशी तक्रार सीता ताई मोरे व आशुतोष मोरे स्थानिक रहिवाशांनी केले. तसेच समाज मंदिर चा गोडाऊन म्हणून वापर होत असल्याने या वस्तूची अवस्था अतिशय वाईट झाली आहे व गावांमध्ये नवीन मंदिर चे बांधकाम करून त्याची भर ही समाज मंदिरापुढे कचरा म्हणून गेल्या ६ महिन्यापासून ग्रामपंचायतने ठेवले आहे. त्याकरिता ताबडतोब ती भर समाज मंदिर समोर कडून हटवण्यात यावी व दलित समाजाला समाज मंदिरापासून वंचित ठेवून ग्रामपंचायतने गोडाऊन बनवून ठेवले आहे. त्याकरिता प्रमिला वाळुंज (गट विकास अधिकारी) यांना निवेदन देण्यात आले व सकारात्मक चर्चा करून साकोरे ग्रामसेवक सोमवंशी यांना फोन कॉल करून समाज मंदिर हे ग्रामपंचायतचा ताब्यातून समाजाला देण्यात येईल व समाज मंदिराची साफसफाई व दुरुस्त करून देण्यात येईल असे आदेश देण्यात आले ,प्रमिला वाळुंज (गट विकास अधिकारी) यांनी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पंकज भाऊराव सरोदे(तालुका अध्यक्ष) व कार्यकारणी यांना आश्वासन देण्यात आले.
निवेदन देताना उपस्थित असलेले आंबेगाव तालुक्यातील कार्यकारणी - पंकज भाऊराव सरोदे(तालुका अध्यक्ष) बुद्धभूषण मोरे (महासचिव) नफिज भाई शेख (उपाध्यक्ष), संगीता ताई मिर्के (उपाध्यक्ष) मेहबूब भाई कुरेशी (उपाध्यक्ष) आशुतोष मोरे (सचिव) बाळासाहेब वाघ (संघटक), सीताताई मोरे (संघटक), संदीप ईश्वर मिरगे (संघटक), ज्ञानेश्वर गाडेकर (सचिव), रंजीत सुरेश यादव (सल्लागार) उत्तम सिताराम वाघमारे (सल्लागार), सुरेश रोकडे (सल्लागार), समीर मुंडे (संपर्कप्रमुख), अक्षय बोराडे (संघटक), शंकर भाऊ शिंदे (घोडेगाव शहर अध्यक्ष), सूर्याताई शेख, मुन्नी ताई शेख, राजेंद्र बोराडे सर, डावकर मॅडम, अक्षय तुकाराम वायाळ, उज्वला मोरे, झुंगाजी मोरे, आकाश भागे, मंगेश राठोड, विशाल भालेराव, राहुल शिंदे, राजेंद्र भावरी, दीपक गाढवे, गायत्री शिंदे, लक्ष्मीबाई शिंदे, शेटेबा शिंदे, आरती मका, गायत्री शिंदे, मंदाताई काळोखे, जंगल बबन काळोखे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन (आंबेगाव तालुका)
COMMENTS