प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर शिनोली दि.२२ शिरूर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदि...
प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर
शिनोली दि.२२
शिरूर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.सकाळी दहा वाजता शिनोलीतुन सुरू झालेल्या दौऱ्यास शिनोली,डिंभे,फुलवले,कोकणेवाडी,बोरघर माळीण अशा अनेक गावांत आदिवासी समाजासह सर्वांनीच त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी देवदत्त निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख दत्ता गांजाळे, भारतीय विद्यार्थी सेना मा.तालुका प्रमुख प्रा. अनिल निघोट, डॉ हरिश खामकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर,
महिला राष्ट्रवादी अध्यक्ष पुजा वळसे, सुरेश अण्णा निघोट, गंगापूर सरपंच संदिप येवले,नागापुर सरपंच गणेश यादव,बोरघर सरपंच विजय जंगले, उपसरपंच राजेश घोडे, चेअरमन सुरेश शेळके, हभप जंगले महाराज, आम आदमी पार्टी चे सलिम इनामदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी या भागात फक्त भुमीपुजन, उद्घाटने सुरू पण कामं वर्षानुवर्षे तशीच खोळंबली असल्याने पाणी,विज, आरोग्य या प्राथमिक गरजांचीही पुरेशी पुर्तता झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.यावर खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थितांना आपल्या मागण्याची दखल घेतली असुन योग्य त्या उपाययोजनांचे आश्वासन देऊन संबंधित अधिकारी वर्गाशी त्वरित फोनवर संपर्क साधुन दप्तर दिरंगाई तर अडलेली किरकोळ कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या.
COMMENTS