मुंबई वृत्तपत्र लेखक संघ यांच्या वतीने मुंबईत कुर्ला नेहरू नगर येथे कापडी पिशव्या मोफत वाटप करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित...
मुंबई वृत्तपत्र लेखक संघ यांच्या वतीने मुंबईत कुर्ला नेहरू नगर येथे कापडी पिशव्या मोफत वाटप करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण महिन्याभरात करण्याचे मानस देखील संस्थे कडून व्यक्त करण्यात आलेला आहे. त्या संकल्पनेचा एक भाग म्हणून नुकतेच महिलाना कापडी पिशव्या मोफत वाटप करण्यात आले आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सल्लागार, संपादक तसेच जेष्ठ साहित्यिक व कवी डाँ. खं र माळवे आणि कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती म्हणून पञकार, उपसंपादक व संस्थेचे सल्लागार शशिकांत राजाराम सावंत,आदिवासी सेवक व संस्थेचे उपाध्यक्ष डाँ सुभाष रामचंद्र सोनंदकर तर संयुक्त कार्यवाह दिलीप महादेव गाडेकर आणि चंद्रशेखर गंगाराम साळगांवकर व कार्यकारी सदस्या सौ माधवी संजय साळगांवकर इत्यादी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष,संयोजक आणि संस्थेचे अध्यक्ष संजय गंगाराम साळगांवकर यानी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. डाँ सुभाष सोनंदकर यानी महिलानी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची थोडक्यात व उपयुक्त माहिती सभेत दिली. यावेळी पदधिकारी व सभासद याना संस्थेच्या आयडी कार्डचे वाटप देखील करण्यात आले. तसेच यावेळी व्यासपिठेवरील मान्यवरांच्या हस्ते सभागृहात उपस्थित असलेल्या महिलांचे स्वागत तथा सत्कार करण्यात आले. कवी व लेखक,संस्थेचे कार्यकारी सदस्य परेश विश्वास नावडकर यांच्या 'मुक्त विचार' या काव्यसंग्रहाचे मान्यवराच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदधिकारी रविकांत कदम,विनोद कांबळे, अमित मांजरेकर,कु अपूर्वा संजय साळगांवकर आणि कुर्ला महिला संघटनेच्या मनाली मनोज वाडकर, स्वाती संजय इनरकर,भारती चंद्रशेखर साळगांवकर,संगीता तुकाराम इनरकर,वैभवी मंगेश चंदनकर,ज्योती दिपक पाटणाकर,सुनिता विलास मुरुडकर,सुवर्णा चंदनकर आणि कु दिपा हरी पारकर इत्यादी उपस्थित होत्या. या सामाजिक उपक्रमाला नेहरू नगर नागरिक मंडळ आणि कुर्ला महिला संघटन नेहरू नगर उत्तर पंचायत यांचे सहकार्य मिळाल्या बदल आभार व्यक्त करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले.
COMMENTS