प्रतिनिधी प्रा अनिल निघोट आमोंडी दि.२८ मार्च आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील आमोंडी ग्रामस्थ आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार...
प्रतिनिधी प्रा अनिल निघोट
आमोंडी दि.२८ मार्च
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील आमोंडी ग्रामस्थ आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असुन प्रसिद्ध निवेदक अमित कातळे प्रस्तुत खेळ पैठणीचा कार्यक्रमात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ आणि भरपूर बक्षीसांची रेलचेल होती.अमित कातळे यांनी आपल्या खास शैलीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.महिलांनीही रोजचीच सुखदुःख विसरुन शिवछत्रपतींचा जयघोष करीत खेळाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. सुरेखाताई निघोट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख, ऊपतालुकाप्रमुख निलम कारले, प्रा अनिल निघोट मा तालुकाप्रमुख भारतीय विद्यार्थी सेना, आंबेगाव,कमल दरेकर यांच्या हस्ते झाले यावेळी सरपंच धनंजय फलके, गटप्रमुख मा उपसरपंच संतोष फलके ग्रा पं सदस्य राम फलके,ताईबाई काळे, ताराबाई जाधव युवासेना ऊपतालुकाप्रमुख गणेश फलके, शाखाप्रमुख केतन फलके उपस्थित होते. आयोजक अध्यक्ष जनार्दन फलके,सोमनाथ फलके, राजेंद्र बिबवे, शंकर खंडागळे, गोकुळ फलके,विष्णू राजगुरु, सोपान फलके,श्रद्धा फलके, प्रतिभा मिंडे,,स्वप्नाली फलके,माया फलके, शिल्पा फलके, सुषमा फलके यांनी कार्यक्रमाचे ऊत्तम नियोजन केले होते.
COMMENTS