प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यम...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये "बालमहोत्सव" बालचमूंच्या अनोख्या ढंगात आणि जल्लोषात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वन आणि सरस्वती पूजनाने शिक्षणतज्ज्ञ व हास्यपंचमीकार महेंद्र गणपुले यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके,सारिकाताई शेळके,संगीता ताई शेळके,मिराताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,जुन्नर पर्यटन संस्थेचे यश मस्करे,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर,डॉ.महेश भास्कर,गुरूकुलचे प्राचार्य सतिश कुऱ्हे,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली आहेर तसेच आणि गावच्या सरपंच प्रियांका दाते,बोरी गावच्या माजी सरपंच वैशाली जाधव तसेच पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.आजचा दिवसचं माझा असं मनाशी ठाण मांडून आनंद द्विगुणित करत जमलेल्या प्रेक्षकांचं आणि पालकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे सर्वांचीच पर्वणी ठरला.चिमुरड्यांची पावलं थिरकली नव्या सुमधुर हिंदी,इंग्रजी आणि मराठमोळ्या गीतांवर.नर्सरी,ज्युनियर केजी,सिनियर केजी,पहिली ते बारावी पर्यंतची सर्वच मुलं या कार्यक्रमात सहभागी झाली होती.बालचमुंच्या उत्साहाचे कौतुक करताना माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके म्हणाल्या की शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध कलागुणांना आणि सुप्त कौशल्यांना आपला सांस्कृतिक वारसा आणि ठेवा जपत वाव देण्याचे काम या स्नेहसम्मेलनातून होते.विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांनी शैक्षणिक विकासासाठी एकत्रित येऊन साधलेला मेळ हाच सर्वांगीण विकासाचा पाया असल्याचं मत यावेळी महेंद्र गणपुले यांनी मांडले.वेल कम गीताने स्नेहसम्मेलनास प्रारंभ करण्यात आला.शिवराज्याभिषेक,देशभक्तीपर गीते,पारंपरिक नृत्यप्रकार,महाराष्ट्रात साजरे केले जाणारे सण आणि उत्सव यावर आधारित गीते,कोळीगीत,भांगडा, बाल्या डान्स,शेतकरी गीत,आध्यात्मिक,सामाजिक,देशभक्तीपर गीते तसेच तत्कालीन परिस्थितीचा वेध घेणारी अशी अनेक गीत यावेळी चिमुकल्यांनी सादर केली.
हास्यपंचमीकार महेंद्र गणपुले यांनी त्यांच्या कार्यक्रमातून अनेक विनोदी किस्से सांगून मुलांचे निखळ आणि मनमुराद हास्य मनोरंजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी सूत्रसंचालन रामचंद्र मते व शितल पाडेकर यांनी तर आभार वैशाली सहाणे यांनी मानले.
COMMENTS