प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नवीन व्यवसायासंदर्भातील नवकल्पना,सर्जनशीलता,उद्योजकता यांचा विकास होण्यासाठ...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नवीन व्यवसायासंदर्भातील नवकल्पना,सर्जनशीलता,उद्योजकता यांचा विकास होण्यासाठी त्यांच्या अंगी आवश्यक अंगीभुत व्यवसाय व उद्योग कौशल्ये वाढवण्यासाठी समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट,बेल्हे या व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने नुकताच समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये "समर्थ बिझ फेस्ट २०२४" चे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करत असताना काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरल्या पाहिजेत.आर्थिक नियोजन कसे असावे,त्याचबरोबर मार्केट सर्व्हेक्शन,रिस्क अनालिसिस,उद्योग व्यवस्थितपणे चालण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बिझनेस प्लॅन,बिझनेस ॲडव्हरटाईजमेंट आणि बिझनेस क्विझ इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बिझनेस फेस्टिवलच्या विविध स्पर्धांमध्ये परिसरातील २० हून अधिक कॉलेजमधील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
बिझनेस प्लॅन स्पर्धेमध्ये पदवी विभागात समर्थ कॉलेज बीसीएस ची आर्या गुंजाळ हिने प्रथम पारितोषिक मिळवले.स्वरूप शेरकर व ग्रुप यांनी द्वितीय तर शरदचंद्र फार्मसी कॉलेज ओतूर च्या जानवी पांडुरंग भेरे ग्रुप यांनी तृतीय बक्षीस मिळवले.
त्याचप्रमाणे सदर स्पर्धेच्या पदव्युत्तर विभागात समर्थ एमबीए कॉलेजची विद्यार्थिनी वैष्णवी शिंदे व ग्रुप यांना प्रथम पारितोषिक,प्रतीक जाधव व ग्रुप द्वितीय पारितोषिक तर नेहा औटी व ग्रुप यांना तृतीय पारितोषिक मिळाले.
बिझनेस ऍडव्हर्टाइजमेंट या स्पर्धेमध्ये पदवी स्तरावर समर्थ लॉ कॉलेज मधील अक्षदा फाजगे ग्रुप यांना प्रथम पारितोषिक तर जयहिंद इंजिनिअरिंग कॉलेज,कुरण येथील संज्योत बाळसराफ आणि ग्रुप यांना द्वितीय क्रमांक तसेच समर्थ इंजिनिअरिंग कॉलेज बेल्हे येथील हरीश धसरवार व ग्रुप यांना तृतीय बक्षीस मिळाले.सदर स्पर्धेच्या पदव्युत्तर स्तरावर वैष्णवी शिंदे व ग्रुप प्रथम पारितोषिक,निकिता खैरे व ग्रुप यांना द्वितीय पारितोषिक व श्रुतिका आतकरी ग्रुप यांना तृतीय पारितोषिक मिळाले.
त्याचप्रमाणे बिजनेस क्विझ या स्पर्धेमध्ये एबीएम कॉलेज नारायणगाव येथील शुभम भोसले व ग्रुप यांना प्रथम पारितोषिक तर समर्थ लॉ कॉलेज बेल्हे येथील श्वेता पवार आणि ग्रुप यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.
या सर्व स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण त्यांची नेतृत्व क्षमता अद्ययावत असे व्यवसाय ज्ञान नवकल्पना या सर्व गुणांस समर्पक असे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला गेला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य डॉ.शिरीष गवळी,डॉ.महेश भास्कर,डॉ.रुस्तुम दराडे,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बिझनेस फेस्टिवलचे सूत्रसंचालन प्रा.शशिकांत ताजने व प्रा.अश्वमेघा सुर्वे यांनी तर आभार प्रा.मनीषा खेमनर यांनी मानले.तसेच समर्थ व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून स्पर्धेचे सर्व नियोजन केले.
COMMENTS