वाटलं होतं मला बाई ,मुंबईला जावं! चौपाटीवर समुद्राच्या भेळपुरी खावं!! मुंबईची गरम हवा बाई, मला सोसना! गर्दीमधी माणसांच्या कोणी आपलं दिसना!...
वाटलं होतं मला बाई ,मुंबईला जावं!
चौपाटीवर समुद्राच्या भेळपुरी खावं!!
मुंबईची गरम हवा बाई, मला सोसना!
गर्दीमधी माणसांच्या कोणी आपलं दिसना!!
मुंबईची गर्दी पाहून जीव झाला येडा!
गेटवेला जाता पाहिला काळा घोडा!!
कुलाब्याची दांडी आता कुठं दिसना!
मुंबईचा मराठी बाणा, मला कुठं दिसना!!
जो तो इथे पळतो आहे पोटापाण्यासाठी!
कोणी एकमेकाशी बोलेना का, मराठी!!
ट्राम गेली बस आली घोडा गाडी दिसना!
टॅक्सी मेट्रो चालवितांना कोणी, मराठी दिसना!!
उंच उंच इमारत आणि टॉवर दिसती फक्त!
किडामुंगीसारखी माणसंच झाली जास्त!!
मुलगा आणि मुलीमधला मला, फरक कळना!
चोर, गुंड, लबाड कोण, साव काही कळना!!
हवाबंद घरात यांचा संसार चाले सारा!
गावाकडच्या कोंबड्यांचा खुराडा तरी बरा!!
वडापाव खाल्याशिवाय यांचं पोट भरणा!
दोघं नोकरी करी तरी, घरी पाळणा हालना!!
काय दशा मुंबईची या माणसांनी केली!
रोगराईत आजाराने दवाखाने भरली!!
खळखळून हसणारा इथ कोणी दिसना!
गावाकडची माणुसकी इथ, कोणात दिसना!!
.......................................
राजेश साबळे,ओतूरकर
मो.९००४६७४२६३
COMMENTS