प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) जुन्नर ता. 2 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र, आय...
प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
जुन्नर ता. 2 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र, आय.क्यू.ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *आधुनिक रोजगाराच्या संधी* या विषयावर जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. संजय शिवाजीराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस माननीय प्राध्यापक योगेश माने व सी. एस. ओ. माननीय आशिष माने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. योगेश माने यांनी बँकिंग, अकाउंटिंग व टॅक्सेशन यांमधील आधुनिक रोजगाराच्या संधी व शेअर मार्केट मधील गुंतवणूक संधी याविषयी मार्गदर्शन केले. आजच्या जगात शेअर मार्केट मधून मिळणारा परतावा हा इतर कोणत्याही बचतीच्या मानाने जास्त असल्याचे मत त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मांडले. त्याचबरोबर श्री. आशिष माने यांनी व्यक्तिमत्व विकास व मुलाखत तंत्र याविषयी मार्गदर्शन करताना मुलाखतीस सामोरे जाताना आपले परिचयपत्र व सादरीकरण उत्तम कसे करता येईल यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मा. प्राध्यापक व्ही . बी. कुलकर्णी सर यांनी आजच्या काळात बचतीची गरज आणि तिचा भविष्यात होणारा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले.
सदर एकदिवसीय कार्यशाळेप्रसंगी प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे आणि उपप्राचार्य डॉ. आर. डी. चौधरी तसेच वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. डॉ. सतीश जाधव, कला शाखाप्रमुख प्रा. डॉ. अभिजीत पाटील, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्रा. सचिन कसबे कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. पल्लवी निखळ आणि वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एस. रेणुकदास व आभार प्रदर्शन प्रा. जे. एन. कणसे यांनी मानले.
COMMENTS