प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी आर्वी, तालुका- जुन्नर येथील श्री शिवनेरी विद्यालयातील मुलींसाठी किशोरवयीन...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी आर्वी, तालुका- जुन्नर येथील श्री शिवनेरी विद्यालयातील मुलींसाठी किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता जनजागृती अभियानांतर्गत "कळी उमलताना" हा उपक्रम डिसेंट फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आला.
यावेळी डॉक्टर संपदा तोडकर व डॉक्टर पूजा गायकवाड यांनी मुलींना मासिक पाळीत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तर डिसेंट फाऊंडेशनचे सचिव एफ.बी. आतार यांनी मुलींना किशोर वय व मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, आर्वी गावचे सरपंच भावेश डोंगरे, दत्तात्रय रोकडे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा तोडकर, सावित्रीबाई फुले वृद्धाश्रमाच्या संस्थापिका नंदाताई मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य अर्चना गाढवे, मुख्याध्यापक एस आर थोरात, डिसेंट फाउंडेशनचे समन्वयक योगेश वाकचौरे आदी मान्यवर, शिक्षक वृंद व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या.
यावेळी डिसेंट फाउंडेशनच्या वतीने १२५ किशोरवयीन मुलींना मोफत "कळी उमलताना" या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. तसेच सरपंच भावेश डोंगरे व दत्तात्रय रोकडे यांच्यावतीने पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅडचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेंद्र तोडकर सर यांनी केले तर आभार थोरात मॅडम यांनी मानले.
COMMENTS