प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) विद्यार्थ्यांनी ज्ञानलालसा आणि कृतज्ञता सोडू नये, मनाला नेहमी प्रश्न विचारावे व उत्तरासाठी धडपड करावी अ...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
विद्यार्थ्यांनी ज्ञानलालसा आणि कृतज्ञता सोडू नये, मनाला नेहमी प्रश्न विचारावे व उत्तरासाठी धडपड करावी असे प्रतिपादन जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघांचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी जिल्हा परिषद शाळा, उच्छिल येथे व्यक्त केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाच्या वतीने आदिवासी भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्छील ठिकाणी निबंध स्पर्धा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली या ठिकाणी चित्रकला स्पर्धा, न्यू इंग्लिश स्कूल आंबोली या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. तिन्ही स्पर्धेत एकूण 75 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छील या ठिकाणी घेण्यात आला.यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व वैज्ञानिक पुस्तक भेट देण्यात आले.
जुन्नर तालुका गणित अध्यापक संघांचे अध्यक्ष प्रवीण ताजणे म्हणाले की, मुलांनी विज्ञानाची कास धरावी. स्पर्धेत हार जीत होत असते, त्याचा विचार न करता सहभागी होणे खूप महत्वाचे आहे.
याप्रसंगी जुन्नर तालुका गणित अध्यापक संघांचे अध्यक्ष प्रवीण ताजणे, मुख्याध्यापक अन्वर सय्यद, पूनम तांबे, विज्ञान शिक्षक व्यंकट मुंढे, लिलावती नांगरे, आरती मोहरे, स्मिता ढोबळे, हेमा दिवटे, छाया अरगडे, निशा साबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्वर सय्यद यांनी केले. उपस्थितांचे आभार नांगरे लिलावती यांनी मानले.
विविध स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे : न्यू इंग्लिश स्कूल आंबोली या शाळेत घेतलेल्या वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी खालील प्रमाणे :-
प्रथम क्रमांक :- भालाचीम अजय पांडुरंग
द्वितीय क्रमांक :- ज्योती रामदास भालचीम
तृतीय क्रमांक :- नम्रता संजय मोहरे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली मधील चित्रकला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम-सानिका दिगंबर भांगे
द्वितीय-आदित्य प्रशांत भालचिम.
तृतीय-अस्मिता सुरेश भालचिम.
उत्तेजनार्थ :गभाले ईश्वर जगन्नाथ.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्चिल या ठिकाणी निबंध स्पर्धा घेण्यात आला त्याचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : भालेराव श्रुती रविंद्र.
द्वितीय क्रमांक : शिंदे श्रावणी सुरेश
तृतीय क्रमांक : नवले तेजस निलेश.
उत्तेजनार्थ :नवले ओम बाळू.
COMMENTS