प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर चिंचोली दि २० फेब्रुवारी संपूर्ण जगातील प्रत्येक देशात १९ फेब्रुवारी ला शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी झाली. श...
प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर
चिंचोली दि २० फेब्रुवारी
संपूर्ण जगातील प्रत्येक देशात १९ फेब्रुवारी ला शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी झाली.
शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची या मोरांसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात तर साक्षात शिवशाही च अवतरली. शिवाभिमान कला क्रीडा मंचाच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.शिवनेरीवरुन ज्ञानेश्वरी नाणेकर, ऊत्तम नाणेकर, योगेश भोसले, सिद्धेश्वर सकपाळ यांनी ज्यास्तीचे अंतर पार करुन तसेच सर्व शिवभक्तांच्या समवेत शिवज्योत आणली त्यानंतर टाळम्रुदूंगाचे गजरात मिरवणूक काढण्यात आली. तर सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात केलेल्या सादरीकरणात
जि.प.शाळा चिंचोली गावठाण प्रथम क्रमांक,ऊकीर्डेवस्ती द्वितीय क्रमांक धुमाळवस्ती त्रुतिय क्रमांक तर अंगणवाडीस चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या शाळकरी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत संपूर्ण शिवचरित्राचे गीत , संगीत, न्रुत्य आणि अभिनयाद्वारे सादरीकरण करून संपूर्ण शिवकाल सादर केला. शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांची तयारी, वेशभूषा याकडे विशेष लक्ष दिले,तर ध्वनी लाईट आणि व्यासपीठ व बैठक व्यवस्थेमुळे शेकडो उपस्थितांनी मुलांच्या कलागुणांना दाद दिली.
शिवजयंती उत्सव आयोजक शिवाभिमान कला क्रीडा मंच व समस्त ग्रामस्थ यांनी ऊत्तम नियोजन केले होते. उद्योजक गुलाबराव धुमाळ,केरूशेठ नाणेकर तसेच गावातली व भोसरीकर ,पुणेकर, मुंबईकर ,उद्योजक, माजी सैनिक, शिक्षक ,पोलीस, गावातील आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य मिळाले. पुढील वर्षी कार्यक्रमाचे पंधरावे वर्ष असुन शिवरायांचे भव्य स्मारक बांधण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमास प्रा. सुरेखा ताई निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख, प्राध्यापक अनिल निघोट मा. तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्थ नाणेकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात शिवाजीराजांची आरती होऊन बक्षीस वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS