प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) गोळेगाव येथील व्यापारी राजेंद्र वऱ्हाडी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नवलेवाडी ( पिंपरी पेंढार ) तालुका ...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
गोळेगाव येथील व्यापारी राजेंद्र वऱ्हाडी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नवलेवाडी ( पिंपरी पेंढार ) तालुका - जुन्नर, जिल्हा - पुणे येथील गरजू आजी - आजोबांना डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आधार काठ्यांचे वाटप केले आहे.
सामाजिक जाणिवेतून राबवलेला हा उपक्रम अनुकरणीय व कौतुकास्पद असल्याचे मत डिसेंट फाऊंडेशनचे सचिव फकीर आतार यांनी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, संचालक आदिनाथ चव्हाण, प्रकाश नवले, नवनाथ नवले, संजय नवले, लक्ष्मण ढगे, स्वप्निल पवार, खंडू नवले आदी मान्यवर ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
COMMENTS