प्रतिनिधी प्रा. अनिल निघोट वाळुंजवाडी दि.१६ फेब्रुवारी आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी येथे सालाबादप्रमाणे म्हसोबा महाराज व गणेश जयंती निमि...
प्रतिनिधी प्रा. अनिल निघोट
वाळुंजवाडी दि.१६ फेब्रुवारी
आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी येथे सालाबादप्रमाणे म्हसोबा महाराज व गणेश जयंती निमित्त आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीत २५१ बैलगाडे सहभागी झाले असुन पहिल्या दिवशी टोकन नंबर १. च्या कै. यशवंतशेठ बाबुराव निघोट ११.९६ सेकंद सह प्रथम क्रमांकाच्या फळीफोड चा तर महेंद्रशेठ पांडुरंग निघोट ११.१० सेकंद सह घाटाचा राजा तर फायनलला रामदासशेठ अनंतराव खानदेशे ११.६१ सेकंद सह फायनल चा मानकरी ठरला.
बैलगाडा शर्यतीसाठी हजारोंच्या संख्येने बैलगाडाशौकीन, आबालवृद्ध, महिलाभगिनी उपस्थित होते.
यात्रेस प्रा. सुरेखाताई निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख महिला आघाडी आंबेगाव यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना महिला आघाडी ऊपतालुकाप्रमुख या सरपंच सोनल वाळुंज, वडगाव काशिंबेग चे सरपंच वैभव पोखरकर, वाळुंजवाडी चे सरपंच नवनाथ वाळुंज, तंटामुक्ती अध्यक्ष गौतम वाळुंज भारतीय विद्यार्थी सेना मा तालुका प्रमुख प्रा अनिल निघोट , प्रसिद्ध बैलगाडा मालक रामनाथ बांगर, गणेश खानदेशे, संतोष भेके, बाबाजी थोरात, आकाश खानदेशे,भक्ते,के के थोरात, संतोष बारवे, राजुशेठ निघोट सचिन साहेबराव निघोट उपस्थित होते.
यात्रा कमिटी अध्यक्ष भिमराव वाळुंज, उपाध्यक्ष रमेश निघोट, यशवंत लोंढे, भानुदास लोंढे, जीवन निघोट, बाळु लोंढे, जीवन लोंढे, मनोहर लोंढे, सतीश शिंदे, अमोल बोर्हाडे, बाबाजी लोंढे, अक्षय वाळुंज, विश्वास शेळके, प्रदिप तोत्रे यांनी यात्रेची ऊत्तम व्यवस्था पाहिली,तर सेकंद कामकाज अविनाश चौगुले, भास्कर वाळुंज,बन्सी वाळुंज, लेखन बापु लोंढे यांनी तर निशान नामदेव लोंढे यांनी पाहिले.
यात्रेकरूंना पहाडी आवाजात शर्यतीचे समालोचन प्रसिद्ध अनाऊंसर साहेबराव आढळराव, नवनाथ वाळुंज, स्वप्निल टेमगीरे स्वप्निल टेमगीरे यांनी करुन बैलगाडा मालक रसिकांची मने जिंकली.
COMMENTS