युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन तर्फे बालगंगा विद्यामंदिर चुनाभट्टी, जिते येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास मार्गदर्शन शिबिराचे आय...
युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन तर्फे बालगंगा विद्यामंदिर चुनाभट्टी, जिते येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन "महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल फेलोशीप ॲवॉर्ड" व "राजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव सन्मान 2024" राष्ट्रीय पुरस्कार विजेते संस्थापक-अध्यक्ष श्री.कैलास कमलाकर घरत यांनी केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी युवा सेना रायगड उपजिल्हा अधिकारी श्री. प्रवीण पाटील होते.आमचे मार्गदर्शक आण्णा श्री.कमलाकर बाबू घरत, यावेळी युवा सेना पेण उपतालुका अधिकारी श्री.जयेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य निखिल म्हात्रे, फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा सौ.मयुरीताई कैलास घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
श्री.प्रवीण भास्करराव गवळी सर यांनी आपल्या ओघवत्या वाणीने कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले तर श्री.महादेव विठ्ठल देवकर सर यांनी आभार प्रदर्शन केले. आपल्या प्रास्ताविकात सामाजिक कार्यकर्ते कैलास घरत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. इयत्ता दहावीच्या 52 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे एक्साम पॅड आणि पेनचे वाटप करण्यात आले. यासाठी शिवसेना जिते विभागप्रमुख श्री.राजू पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
श्री.कृष्णा महादेव वर्तक सर माजी केंद्र प्रमूख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन श्री. प्रवीण पाटील, निखिल म्हात्रे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि शिक्षण महर्षी परमपूज्य बापूजी साळुंखे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन सामाजिक कार्यकर्ते
श्री.कैलासराजे घरत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी शिक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता. या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक माजी केंद्र प्रमूख निवृत्त शिक्षक हभप श्री कृष्णा वर्तक सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असे अनमोल मार्गदर्शन केले. याचा फायदा १० वीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल आणि ते परीक्षेत भरघोस गुणांनी उत्तीर्ण होऊन प्राविण्य मिळवतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बालगंगा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.छाया पाटील मॅडम, इतर शिक्षक वृंद ,विद्यार्थी मित्रांचे सहकार्य लाभले.
सर्वांचे आभार मानून ह्या शिबिराची सांगता करण्यात आली. जिते ग्रामस्थ आणि पालक वर्गाकडून या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.
COMMENTS