प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) जुन्नर ता. 21 : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे सा. फु. विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ, ...
प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
जुन्नर ता. 21 : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे सा. फु. विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ, अर्थशास्त्र विभाग व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी 'आर्थिक साक्षरता ' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड. संजय शिवाजीराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी.वाघमारे यांनी दिली.
सदर कार्यशाळेस मा. अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील कोटक म्युचुअल फंड चे चॅनल हेड मा. श्री. नितल मुजुमदार, पुणे येथील प्रुडंट कंपनीचे एरिया मॅनेजर मा. श्री . जमीर शेख , प्रुडंट कंपनीच्या आर्थिक सल्लागार मा. सोनिया समेळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे तर प्रमुख उपस्थिती मध्ये कला शाखा प्रमुख प्रा.डॉ.अभिजित पाटील व वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. सतीश जाधव हे उपस्थित होते . या कार्यशाळेमध्ये प्रमुख व्याख्याते मा. नितल मुजुमदार यांनी प्रेझेंटेशनच्याद्वारे म्युचुअल फंडातील एसआयपी, एसडब्युपी, एसटीपी, विमा, गुंतवणूकीचे इतर मार्ग इ. विविध विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.मा. सोनिया समेळ यांनी आर्थिक साक्षरता विषयी तसेच ती अवगत करण्यासाठी असणारे मार्ग यांची विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे यांनी सांगितले ' खऱ्या अर्थाने आपल्या तरूण पिढीला प्रेरणादायी व कृतीशील बनवण्यासाठी आर्थिक साक्षरता खुप महत्वाची असून विद्यार्थ्यांना अधिक माहीत जाणून घेणे साठी भारताची महासत्तेकडील वाटचाल व गुंतवणुकीचे महत्व जाणून घेण्यासाठी आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सुप्रिया काळे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार विद्यार्थी विकास अधिकारी व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सचिन कसबे यांनी व्यक्त केले. ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी विद्यार्थी विकास मंडळातील सहकारी प्राध्यापक वृंद तसेच इतर महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
COMMENTS