प्रतिनिधी : शरद शिंदे सुराळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुर्ग संवर्धन संस्था, उर्मी फाऊंड...
प्रतिनिधी : शरद शिंदे
सुराळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुर्ग संवर्धन संस्था, उर्मी फाऊंडेशन पुणे यांच्या प्रयत्नातून एफिनिटी एक्स कंपनीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर, सायन्स किट व खाऊचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील ४८ शाळांना या संस्थांच्या माध्यमातून साहित्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार मा. संजय डुंबरे यांच्या प्रयत्नातून साहित्य प्राप्त झाले. यावेळी या दुर्गसंवर्धन, उर्मी फाऊंडेशन व एफिनिटी एक्स कंपनीचे प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, संतोष पानसरे सर व शिक्षक वृंद उपस्थित होता. सर्वांचे मनापासून आभार यावेळी मानण्यात आले.
COMMENTS