प्रतिनिधी प्रा.अनिल निघोट सर निघोटवाडी दि २८ फेब्रुवारी संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या निघोटवाडी येथे ४२५ बैलगाड्यांसह भव्य बैलगाड...
प्रतिनिधी प्रा.अनिल निघोट सर
निघोटवाडी दि २८ फेब्रुवारी
संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या निघोटवाडी येथे ४२५ बैलगाड्यांसह भव्य बैलगाडा शर्यत सुरू झाली असुन विक्रम शेठ बोत्रे येलवाडी सरपंच मावळ यांचा बैलगाडा फळीफोड चा मानकरी ठरला.तर झेंडया बैलाचे मालक ब्रजेश धुमाळ ११ पॉईंट १५ सेकंद सह घाटाचा राजा ठरला तर शर्यतीत विलासशेठ बबनराव काळोखे सह भानुदास देवराम काटे पिंपळे सौदागर व ओम्या बैलाचे मालक रामनाथ वारिंगे वारंगवाडी ता.मावळ, चंद्रकांत धुमाळ पेठ, सचिन साऊंड सर्व्हिस, पैलवान निलेश लोखंडे,लखन पवार खालुंब्रे मावळ, दत्तात्रय वळसे पाटील, खुशाल सस्ते पिंपरी चिंचवड,नामदेव भरणे माण मुळशी,फंटया ग्रुप खडकी, गणेश लांडे तेजेवाडी जुन्नर,प्रक्रुती वाघमारे श्रीगोंदा,गबाजी पानसरे,किरण साकोरे केंदुर, धनेश टेमकर,सुनिल घुंडरे, बाळासाहेब चौगुले,मयुरशेठ वाबळे, विनायक मोरे चिखली,हे बैलगाडे दुपारी दिड वाजेपर्यंत प्रथम क्रमांकात आले.अतीशय काटा निर्णयासाठी प्रसिद्ध निघोटवाडी यात्रेत शिवाजीशेठ निघोट माजी सरपंच आणि संभाजीशेठ निघोट चेअरमन घड्याळ कामकाज पहात असुन निशान सचिन साहेबराव निघोट पहात आहेत.
यात्रा शुभारंभ उद्घाटन वसंत बाणखेले, जयसिंग एरंडे, रोहिदास ठाकुर यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रसिद्ध बैलगाडामालक संपतराव खेडकर रांजणगाव,दत्ता भोर, संतोष बारवे, रामनाथ बांगर, सोपान पोखरकर,सागर जाधव चिखली, बाजार समिती संचालक सचिन पानसरे, सरपंच अंकुश लांडे, रामदास खानदेशे, जगन्नाथ वाबळे तसेच पुणे,नगर जिल्ह्यातील नामवंत बैलगाडा मालक उपस्थित होते.
निघोटवाडी ग्रामस्थांच्या वतीने प्रा सुरेखाताई निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख, सरपंच नवनाथ निघोट,ग्रा पं.सदस्य विनोद निघोट, संदिप निघोट, बाबाजीशेठ टेमगीरे,सनद निघोट, दयानंद एरंडे, अरुण निघोट सहा.पोलीस निरीक्षक, रमेश निघोट,ज्येष्ठ नागरिक संघाचे हनुमान निघोट, बाळासाहेब निघोट , विजय निघोट, कैलास निघोट,प्रा.अनिल निघोट व निघोटवाडी ग्रामस्थांनी यात्रेकरूंचे स्वागत केले.
बैलगाडा शर्यतीत आपल्या अनाउन्सींगने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे साहेबराव आढळराव, लक्ष्मण बांगर, बाळासाहेब टेमगीरे, सुभाष लांडगे यांनी समालोचन केले.
COMMENTS