प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) सिनॉप्सीस,अन्वेषण,सर्व शिक्षा अभियान आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या सहयोगाने महाराष्ट्र,गुजरात...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
सिनॉप्सीस,अन्वेषण,सर्व शिक्षा अभियान आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या सहयोगाने महाराष्ट्र,गुजरात आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नुकतीच विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्प स्पर्धा कुर्ला,मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
शाळा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नवउपक्रमशीलतेला,नवनवीन कल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या विज्ञान आणि तंत्रज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र,गुजरात आणि गोवा या राज्यातून अंतिम फेरीमध्ये सुमारे ४० प्रकल्पांची निवड करण्यात आलेली होती.
या स्पर्धेमध्ये समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग अंतिम वर्षात शिकत असलेले ऋतुजा डुकरे,मोमीन सिमरन आणि समर्थ गुरुकुल मधील श्रेयश डोंगरे व साहिल भोसले या ग्रुप ने सादर केलेल्या "स्मार्ट एनर्जी मीटर युजिंग आय ओ टी" या प्रकल्पास पाचवा क्रमांक तर समर्थ गुरुकुल मधील प्रिया राजदेव व अद्वैत शिंदे आणि समर्थ अभियांत्रिकी मधील मोनिका खरमाळे व संकेत लोंढे या ग्रुप ने सादर केलेल्या "ब्लूटूथ कंट्रोल ग्रास कटर अँड पेस्टीसाईड स्प्रे रोबोट" या प्रकल्पास उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावल्याची माहिती समर्थ अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी व गुरुकुल चे प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली.
तसेच डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,आकुर्डी येथे आयोजित केलेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग अंतिम वर्षातील सोनाली नाभगे व मोनिका खरमाळे यांनी सादर केलेल्या "ब्लूटूथ कंट्रोल ग्रास कटर अँड पेस्टीसाईड स्प्रे रोबोट" या प्रकल्पास प्रथम क्रमांक तर प्रतीक्षा फापाळे व सुमित दांगट या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या "सोलर बेस्ड रेन रुफिंग फॉर क्रॉप प्रोटेक्शन अँड वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम युजिंग आय ओ टी" या प्रकल्पास तृतीय क्रमांक मिळाला.
कुर्ला येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये गुरुकुल च्या सार्थक आहेर याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसोबत प्रकल्प तयार करताना चे अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
पाचव्या क्रमांकासाठी रोख रुपये १० हजार,सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ रुपये ५ हजार,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
हा प्रकल्प तयार करण्यासाठी समर्थ अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी व प्रा.प्रियांका लोखंडे,प्रा.निलेश नागरे,प्रा.वैशाली सरोदे,राणी बोऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
COMMENTS