मंचर : अखिल भारतीय किसान सभा पुणे यांच्या वतीने जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकर्यांनी हिरडा नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी उपविभागीय का...
मंचर : अखिल भारतीय किसान सभा पुणे यांच्या वतीने जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकर्यांनी हिरडा नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी उपविभागीय कार्यालय मंचर आवारात गुरूवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ पासून बेमदत उपोषण सुरू आहे.
या उपोषणाला आंबेगाव तालुक्यातील अमोल वाघमारे तसेच तरूण व महिला भगिनी या उपोषणाला बसले आहेत.
या पाठींबा दर्शविण्यासाठी अॅडव्होकेट नाथा शिंगाडे व आदिवासी वादळ देवराम लांडे हे उपस्थित होते.
या उपोषणाला उद्देशून आदिवासी वादळ देवराम लांडे यांनी आपल्या खास शैलीत भाषण केले, यावेळी शेतकर्यांच्या हिरडा प्रश्नावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या शिवजयंतीला किल्ले शिवनेरीवर येऊ देणार नाही असा थेट इशारा लांडे यांनी यावेळी दिला.
COMMENTS