प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) *जुन्नर, ता. 17* : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत श्री शिव छत्रपती ...
प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
*जुन्नर, ता. 17* : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत श्री शिव छत्रपती महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी विकास मंडळ, विद्यार्थिनी मंच व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *'निर्भय कन्या अभियान '* शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड. संजय शिवाजीराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. वाघमारे यांनी दिली.
या अभियानाचे उदघाटन संस्थेच्या खजिनदार मा.सौ. कांताताई मस्करे यांच्या हस्ते करण्यात आले. मा. अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही.बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाअंतर्गत स. 9 वा. महाविद्यालयीन विद्यार्थिनीसाठी *स्वसंरक्षण करण्याकरिता कराटे प्रशिक्षणाचे* आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जुन्नर येथील कराटे प्रशिक्षक मा. सौ. धनश्री जायकर व मा.श्री. किरण जायकर यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाकरिता कराटेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या अभियानाच्या व्याख्यानमालेमध्ये *महिला व कायदे* विषयावर जुन्नर न्यायालय येथील मा.अॅड. कुसुम उतळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना महिलांविषयक विविध कायद्यांची माहिती सांगितली. तर व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रामध्ये *महिला सबलीकरण* या विषयावर जुन्नर पोलीस स्टेशन येथील महिला हेड कॉन्स्टेबल मा. मनिषा ताम्हाणे यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदेशीर भारतीय दंड संहितेतील कलमांची माहिती दिली. निर्भय बनण्याकरिता विद्यार्थिनींनी आपले हक्क व कर्तव्य समाजामध्ये पार पाडणे गरजेचे आहे ,असे स्पष्ट केले. वेळप्रसंगी पोलीस स्टेशन कार्यालयाची मदत घेणे आवश्यक असल्याची माहिती दिली. या अभियानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे होते. त्यांनी अध्यक्ष मनोगतातून सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले यांचे दाखले देत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच समाजामध्ये निर्भय राहण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयातील कला शाखा प्रमुख डॉ. अभिजीत पाटील, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. सतीश जाधव, IQAC विभाग प्रमुख डॉ. विनायक लोखंडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनीं मंच प्रमुख प्रा.डॉ. सौ. वंदना नढे , सूत्रसंचालन प्रा.डॉ.वर्षा देसाई तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सचिन कसबे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
COMMENTS