प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे किल्ले शिवनेरी गडावरील शासकीय शिवजयंती सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत असून आज जिल्हाधिकारी डॉ.राज...
प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे
किल्ले शिवनेरी गडावरील शासकीय शिवजयंती सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत असून आज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे शिवजयंती आढावा बैठक घेण्यात आली. आढावा बैठकीला माझ्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांसह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
गडाच्या पायथ्याशी वाहनतळाची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, स्वच्छता गृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य पथके, रुग्णवाहिकांची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था यांसह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी समन्वयाने वेळेत आवश्यक नियोजन पूर्ण करावे असे डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
या बैठकी मध्ये शिवप्रेमींनी सोहळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने उपयुक्त सूचना मांडल्या. बैठकीला मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, त्याचबरोबर सोहळ्याशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
#अतुल_वल्लभशेठ_बेनके #AtulBenke
#जुन्नर #आम्ही_जुन्नरकर #Junnar
COMMENTS