प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) सोमवार दिनांक २९/०१/२४ रोजी सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन , ग्रामपंचायत सावरग...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
सोमवार दिनांक २९/०१/२४ रोजी सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन , ग्रामपंचायत सावरगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १६२ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून ४७ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले. शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार असून, रुग्णांना प्रवास, निवास व जेवण मोफत दिले जाणार आहे. तसेच एक महिन्याची औषधे देखील मोफत दिली जाणार आहेत.
डिसेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून व आर झुणझुणवला शंकरा आय हॉस्पिटलच्या सहकार्याने जुन्नर तालुक्यात आत्तापर्यंत बारा शिबिरे पूर्ण झाली असून, जवळपास पाचशे रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली.
यावेळी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सावरगाव चे सरपंच दीपक बाळसराफ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय जाधवर, डॉ. नम्रता पवार, आर झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डिसेंट फाऊंडेशनचे सचिव एफ.बी.आतार, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य उमेश जाधव, रंजनाताई बाळसराफ, शारदाताई राजगुरू, पोलीस पाटील रुपेश जाधव, अशोक बाळसराफ, साळुंखे गुरुजी,मारुती शिंदे, आरोग्य सहाय्यक शिवपुत्र कोळी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचेरे, अशा सेविका, गटप्रवर्तक, परिचारिका, ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS