बातमी संकलन : प्रा.प्रतिमा काळे पुणे:२५जानेवारी २०२४ पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक दत्तोपासक डाॅ.मधुसूदन घा...
बातमी संकलन : प्रा.प्रतिमा काळे
पुणे:२५जानेवारी २०२४
पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक दत्तोपासक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना
संत सावता माळी साहित्य संमेलन समिती तर्फे आयोजक डाॅ.शंतनु रसे यांच्या शुभहस्ते नुकतेच
' संत सावता माळी साहित्य जीवन गौरव ' पुरस्काराने
सन्मानीत करण्यात आले,तर,सौ.प्रतिमा अरुण काळे,लेखिका,कवयित्री,शिक्षिका यांना राष्ट्रमाता सावित्री देवी नारी सन्मान देवून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी ह.भ.प.रामकृष्ण दादा पाटील महाराज,डाॅ.शिवाजी शिंदे , संत साहित्य अभ्यासक जयकुमार सर्जन,पी.आर.गृप पब्लिकेशनच्या प्रकाशिका उज्वल रसे ,माजी सभापती विक्रम ठाकरे, सहआयोजक डाॅ.वैभव वाघ,समिक्षा चव्हाण तसेच अभिनेत्री वंदना भंडारे आदि मान्यवर
उपस्थित होते.सदर पुरस्कार वितरण सावता माळी साहित्य संमेलन समिती,
वरुडतर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सावता माळी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.संमेलनात
एकपात्री कार्यक्रम,संत सावता माळी अभंग समिक्षा,परिसंवाद, काव्यसंमेलन,महात्मा फुले
विचारधारा विषयक व्याख्यान इ.विशेष कार्यक्रम घेण्यात आले.तसेच डाॅ.घाणेकर संपादित डहाळी
साहित्य संमेलन विशेषांकही
प्रकाशीत करण्यात आला.
"संत सावता माळी" यांचा आदर्श ठेवून साहित्यिकांनी
आपल्या प्रतिभेत अंतर्मूख होऊन विठोबा रखुमाई पहावी " असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. ह.भ.प
रामचंद्र महाराज यांनी उदघाटन केले.डाॅ.शंतनू रसे
यांनी प्रास्ताविक केले.उज्वला रसे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.
COMMENTS