प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर ) धामारी दि.२० जानेवारी शिरूर तालुक्यातील धामारी येथे भव्य खंडेराय यात्रेस पंचक्रोशीतील हजारो आबालवृद्ध ,...
प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर )
धामारी दि.२० जानेवारी
शिरूर तालुक्यातील धामारी येथे भव्य खंडेराय यात्रेस पंचक्रोशीतील हजारो आबालवृद्ध , बैलगाडाशौकीन,दुकानदार, मोठमोठे पाळणे, हॉटेल, रसवंती गृह आणि बैलगाडा मालक, पहिलवान सहभागी झाले होते.
यात्रा चार दिवस चालली,ज्यात एक दिवस आखाडा, मालती इनामदार यांचे लोकनाट्य व ४६२ बैलगाड्यांसह शर्यतींचे आयोजन करण्यात आले.
यात्रेस प्रा.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख, प्रा. अनिल निघोट मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
प्रथम क्रमांकात४८, द्वितीय १४२, त्रुतिय १०२, चतुर्थ ५५, पाचव्यात २६ बैलगाडे आले.
पहिल्या दिवशी फायनल ला सागर क्षिरसागर ११.३६ सेकंद (११ पॉईंट ३६ सेकंद), तर घाटाचा राजा सुनिल पठारे चर्होली ११.२३ सेकंद, दुसऱ्या दिवशी फायनल गोपीनाथ भंडारे वढु ११.६२ सेकंद तर घाटाचा राजा पांडुरंग काळे गव्हाण वाडी ११.१७ सेकंद,तर तिसऱ्या दिवशी फायनल राहुल गोरे११.२९ सेकंद तर घाटाचा राजा राहुल गोरे चाकण ११.१६ सेकंद ठरला तर २० फुटावर कांडे लावून किसन कंद्रुप करंदी११.६६ सेकंद प्रथम आला.
या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेचे ऊत्तम नियोजन यात्रा कमिटी अध्यक्ष बबनराव डफळ, उपाध्यक्ष मारुती डफळ,मा सरपंच कैलास डफळ,संभाजी पावले, एकनाथ डफळ, सरपंच सुरेखा पावसे,उपसरपंच जयमाला संपत कापरे, गाडामालक शिवाजी डफळ,अनिल कापरे, गुलाब डफळ, चांगदेव डफळ, तानाजी साळुंके, सुदाम डफळ, अण्णासाहेब कापरे, सचिन डफळ, संभाजी पावसे,, अनिल भगत यांनी पाहिली तर सेकंद कामकाज नवनाथ डफळ,संपत कापरे तर निशान बाळासाहेब साळुंके यांनी पाहिले.
अनाऊंसर माऊली मुळे, बबनराव मेंगडे, सुनिल मोरवे, राहुल थिटे, संतोष ढोकले, अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब टेमगीरे, स्वप्निल टेमगीरे, अर्जुन विधाटे,दौलत पर्हाड, शिवाजी ढोरे, शेळके, प्रविण सावंत, स्वप्निल सोनवणे यांनी आपल्या पहाडी आवाजात शर्यतीचे समालोचन करुन बैलगाडा रसिकांना मंत्रमुग्ध केले.
COMMENTS