तेजूर – जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेजूर ता. जुन्नर जि. पुणे येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा क...
तेजूर – जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेजूर ता. जुन्नर जि. पुणे येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम जि प प्राथमिक शाळा तेजूर याठिकाणी झेंडा वंदनाचा कार्यक्रम पोपटराव वाघमारे तेजूरकर ( सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यांच्या हस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर विद्यार्थी भाषणे, मान्यवरांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
या
सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपटराव वाघमारे हे होते, मान्यवर व ग्रामस्थ महिला
भगिनी तसेच शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या
वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल इंग्रजी व मराठी भाषेत आपली
मनोगते व्यक्त केली, यानंतर ग्रामस्थांची भाषणे झाली, पोपटराव वाघमारे यांनी
शाळेला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही, व शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी जे
काही करता येईल ते करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व सर्वांना प्रजासत्ताक
दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या
कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी,
पालक, ग्रामस्थ, पाहुणे
मंडळी यांचे शाळेच्या वतीने स्वागत व आभार मानले.
COMMENTS