प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ नारायणगाव चा १९ वा वर्धापन दिन सोहळा श्री संत हरी स्वामी सांस्कृति...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ नारायणगाव चा १९ वा वर्धापन दिन सोहळा श्री संत हरी स्वामी सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केला होता. याप्रसंगी परिसरातील असंख्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासत निराधार गरीब आजी-आजोबांना काठीचा आधार मिळावा यासाठी प्रा.लहूजी गायकवाड, प्रवीण पवार व जितेंद्र वाजगे यांनी योगदान दिले. मान्यवरांच्या उपस्थितीत आजी-आजोबांना आधार काठ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ज्या ज्येष्ठांनी सहजीवनाची ५१ वर्षे पूर्ण केली व ज्यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण झाली अशा ज्येष्ठांचा तसेच जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ स्वतंत्र सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी फेस्कॉम महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरुण शेंडे, पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटील, उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, समन्वय समिती अध्यक्ष प्रा. एकनाथ डोंगरे, राजेंद्र मेहेर, राजश्रीताई बेनके,ज्योतीताई संते, सुरज वाजगे, श्रीमती नंदा मंडलिक, आदिनाथ चव्हाण, फकीरा आतार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS