आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्रा अनिल निघोट निघोटवाडी येथील लांडकमळा प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी अंगण...
आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्रा अनिल निघोट
निघोटवाडी येथील लांडकमळा प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी अंगणवाडी ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी भाषणे, देवभक्तीपर गीत व बेटी बचाव बेटी पढाव हे नाट्य सादर केले त्याला उपस्थितांनी दाद दिली.
यावेळी प्रा.सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुकाप्रमुख , निघोटवाडी ग्रा पं सदस्य विनोद निघोट, कार्यक्रम व तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीशेठ निघोट यांनी विद्यार्थी व उपस्थितांना शुभेच्छा देऊन विद्यार्थी प्रगती व व्यासपीठावर येऊन भाषणे केल्याबद्दल कौतुक केले.
यावेळी मा सरपंच, बाजार समिती संचालक शिवाजीशेठ निघोट मित्र मंडळ व विपुल निघोट आचारी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना लेखन पॅड चे वाटप तर प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुंबई मंडळ अध्यक्ष दशरथ निघोट, ऊपतालुकाप्रमुख सचिन निघोट,ग्रा पं सदस्य निलेश निघोट,सीमा निघोट, पतसंस्था संस्थापक मारुती निघोट, डॉ सोनल निघोट अनसु निघोट, तानाजी भेके, बाळशिराम निघोट, रमेश निघोट, तुकाराम निघोट,देवा भेके,प्रा.अनिल निघोट ,भिवसेन निघोट , बाळासाहेब निघोट, शिक्षक बारवकर , सचिन रोडे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
COMMENTS