बोतार्डे – जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोतार्डे पो. खानगाव ता. जुन्नर जि. पुणे येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत...
बोतार्डे – जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोतार्डे पो. खानगाव ता. जुन्नर जि. पुणे येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम ग्रामपंचायत बोतार्डे, नंतर पशुवैद्यकीय दवाखाना आणि त्यानंतर जि प प्राथमिक शाळा बोतार्डे याठिकाणी झेंडा वंदनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर विद्यार्थी भाषणे, मान्यवरांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
या
सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन मरभळ कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर
विद्यमान संचालक यांची निवड करून , मुख्याध्यापिका रेखा मोहिते यांनी अनुमोदन दिले
व यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात
आली, कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा मोहिते यांनी अतिशय
बहारदार पध्दतीने देत सर्वांची मने जिंकली, या कार्यक्रमप्रसंगी वंदना डोळस
ग्रामपंचायत विद्यमान सरपंच, सुलोचना मरभळ विद्यमान सदस्या ग्रामपंचायत बोतार्डे,
संतोष मरभळ ग्रामपंचायत सदस्य बोतार्डे, नलिनी तलांडे ग्रामपंचायत सदस्या बोतार्डे,
हिराबाई मरभळ सदस्या ग्रामपंचायत बोतार्डे, कुलदिप कोकाटे पोलीस पाटील बोतार्डे, डॉ.
संदिप डोळस, सुभाष मरभळ, अमोल मरभळ पेसा अध्यक्ष बोतार्डे, गुलाब आमले तंटामुक्ती
अध्यक्ष, चैतन्य घोडे तंटामुक्ती उपाध्यक्ष, सुरेश खरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
उपाध्यक्ष जुन्नर तालुका, नांगरे भाऊसाहेब ग्रामसेवक, डॉ. गाडेकर पशुवैद्यकीय
दवाखाना बोतार्डे, पोपट मरभळ माजी सदस्य
ग्रामपंचायत बोतार्डे, लक्ष्मण डावखर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, दादाभाऊ मरभळ मा.तंटामुक्ती अध्यक्ष, अशोक पानसरे, विश्वास मरभळ, बबन शिंदे, नवनाथ खरात,
मयुर आमले, संजय आमले, रमेश ढोले, मोहन लांडे,विजय पोटे, हे मान्यवर व ग्रामस्थ
महिला भगिनी तसेच शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या
वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल इंग्रजी व मराठी भाषेत आपली
मनोगते व्यक्त केली, यानंतर बाळू खरात यांनी संविधान व प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती
दिली व सर्वांना शुभेच्छा दिल्या, पोपट मरभळ मा. ग्रा. पं. सदस्य यांनी देखील प्रजासत्ताक
दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या, डॉ. गाडेकर
यांनी देखील आपले मनोगत मांडले व सर्वांना शुभेच्छा दिल्या, वंदना डोळस सरपंच
बोतार्डे व सुरेश खरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी विद्यार्थी व नागरीकांस
प्रजासत्ताक दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन मरभळ यांनी
शाळेला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही, व शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी जे
काही करता येईल ते करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व सर्वांना प्रजासत्ताक
दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जि. प. प्राथमिक शाळा बोतार्डे येथील विद्यार्थीनी साक्षी संपत मरभळ हिने जवळपास ६ केंद्रस्तरीय व बीटस्तरीय उपक्रमांमध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल तिचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला.
मुलांच्या
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तळपे मॅडम, मुख्याध्यापिका रेखा मोहिते मॅडम यांनी
मौलिक काम केले.
या
कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी,
पालक, ग्रामस्थ, पाहुणे
मंडळी यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका रेखा मोहिते यांनी स्वागत व आभार मानले.
तसेच
प्रजासत्ताक दिनी नागरगोजे सर, मंगल मरभळ मॅडम,
चंद्रकांत काजळे यांनी शाळेला देणगी रूपामध्ये
दोन android TV. भेट दिली यावेळी शाळेच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक
स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले.
या
सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश शिंदे यांनी केले व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन
मरभळ यांनी केले व कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका रेखा मोहिते यांनी केले. या
नंतर सर्वांना भोजन देण्यात आले.
COMMENTS