प्रतिनिधी : जुन्नर जुन्नर तालुक्यातील दिव्यांग व जेष्ठ नागरीक लोकांना श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप च...
प्रतिनिधी : जुन्नर
जुन्नर तालुक्यातील दिव्यांग व जेष्ठ नागरीक लोकांना श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप च्या वतीने मोफत साहित्य वाटप पुर्व नाव नोदणी करण्यासाठी आवहान केले होते नाव नोदणी झालेल्या लोकांना दिनांक 19जानेवारी 2024 रोजी रूचिका क्लब मुंबई व संम्पर्क संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 19जानेवारी व 20जानेवारी दोन दिवस डोळे , कान , नाक , घसा , स्त्रीरोग वैद्यकीय मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम मध्ये पुणे जिल्हातील व आसपासच्या परिसरातील तसेच जुन्नर तालुक्यातील दिव्यांग व जेष्ठ नागरीक तसेच नागरीक शिबिरात लाभ घेण्यासाठी आले होते कार्यक्रम चे उद्घाटन रूचिका क्लब मुंबई व संम्पर्क संस्थेचे विश्वस्त अमित कुमार बॅनर्जी किरण आर्या , किरण हुलावले रूचिका क्लब च्या आशा झुंजूनवाला ज्योती राजन सुमित्राजी संम्पर्क चे मुख्यकार्यकारी अधिकारी अनुज सिंग कृष्णा सातोर्डकर डाॅ. गिरी बालाजी डाॅ. अमोल शिंदे श्री राधेश्याम चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन दिपज्वलन प्रतिमा चे पूजन करण्यात आले
या शिबिरात एकूण 936 डोळे तपासणी करून 835 नंबरचे चश्मा औषधोपचार केले 464 लोकांच्या कान नाक घसा तपासणी करून औषधे देण्यात आली व 215 दिव्यांग व मुकबधीर शाळा जुन्नर चे विद्यार्थी जेष्ठ नागरीक यांना मोफत कानाची मशीन वाटप व सर्व रूग्णाना बॅल्केट वाटप व अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली या वेळी जुन्नर तालुक्यातील 140 लोकांना कार्यक्रम ठीकाणी जाण्यायेण्यासाठी जुन्नर तालुका चे आमदार श्री अतुलदादा बेनके ,विशालजी तांबे गटविकासाधिकारी हेमंत गरीबे तालुका आरोग्य अधिकारी वर्षा ताई गुंजाळ यांनी मदत केली या वेळी जुन्नर हून 7 गाडीची व्यवस्था करण्यात आली श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र चे ,अरूण शेरकर अध्यक्ष ,राहुल मुसळे उपाध्यक्ष ,पुष्पा ताई गोसावी राष्ट्रवादी अपंग सेल पुणे जिल्हा अध्यक्षा, सौरभ मातेले ,श्रीहरी नायकोडी , श्री केरभाऊ नायकोडी वर्षाताई शिंदे ,प्रांजळ गोसावी , दिलीप रोकडे , चाकण चे सामाजिक कार्यकर्ते श्रीनाथ लांडे पंचायत समिती सदस्य चाकण , एच व्ही देसाई रुग्णालयाचे डाॅक्टर टीम व संम्पर्क संस्था मेडिकल अधिकारी व सहकारी , डाॅ. प्रशांत वेखंडे वैद्यकीय अधिकारी संम्पर्क मळवली , मुकबधीर शाळा विद्यार्थी व विशेष शिक्षका सौ. रंजना पानसरे मॅडम
दिव्यांग बांधव उपस्थित होते अमित कुमार बॅनर्जी यांनी पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले या वेळी आईच्या प्रेमावर आधारीत लक्ष्मी बाई राऊत जुन्नर यांनी कविता सादर केल्या श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक चव्हाण यांनी लवकरच जुन्नर तालुक्यात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे या करीता मोफत साहित्य वाटप पुर्व नाव श्री राधेश्याम संस्थेच्या कार्यालयात नोदणी करून घ्यावी म्हणून आवाहन केले आहे
COMMENTS