प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनि...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी व समर्थ लॉ कॉलेज बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित " युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास लोकसंख्या नियंत्रण जनजागृती" उपक्रमांतर्गत "विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर" १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत राजुरी येथे संपन्न होत आहे.
स्वच्छ भारत अभियान आणि प्लास्टिक मुक्त भारत या संकल्पनेला मूर्तिमंत रूप देण्यासाठी शिबिरातील विद्यार्थ्यांनी आज वन विभाग जुन्नर व ग्रामपंचायत उंचखडक यांच्या सहकार्याने उंचखडक(खबडी)येथे जाऊन प्लास्टिक मुक्त खबडी करण्याचा निश्चय केला आणि दिवसभरात खबडी आणि परिसरातून साडे चार किलो प्लास्टिक बाटल्या,१५ किलो सुकलेला पालापाचोळा,आठ किलो काचेच्या रिकाम्या बाटल्या,पाच किलो इतरत्र पडलेले कागदाचे तुकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा आणि अनावश्यक बाबींचा निचरा आणि विल्हेवाट लावण्यात आली.या ठिकाणी पर्यटक सहली साठी येतात. बरोबर आणलेले जेवणाच्या पत्रवळ्या, प्लास्टिकचे ग्लास इतरत्र टाकून देतात व नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सृष्टी सौंदर्य यांचे नुकसान करतात,त्याच ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत निसर्गाला मित्र मानून त्याचे जतन व रक्षण करण्याचा संदेश या कृतीतून दिला.रस्त्याच्या दुतर्फा साचलेला कचरा,पाझर तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या पत्रावळी,प्लास्टिक पिशव्या,ग्लास,प्राण्यांची हाडे,बाटल्या यांचीदेखील योग्यरितीने विल्हेवाट लावली.विद्यार्थ्यांना खबडी व परिसराची माहिती देताना जगताप म्हणाले की हा परिसर पर्यटन स्थळ होण्यासारखा आहे.निसर्ग हा आपला सोबती असून पर्यावरणाचे आणि निसर्गाचे घट्ट नाते आहे.ते अधिक मजबूत करण्यासाठी निसर्ग नियम पाळावेत.वनविभाग आणि ग्रामस्थ यांनी परस्पर सहकार्याने जाणीवपूर्वक काळजी घ्यावी व इतरांनाही यात समाविष्ट करून घ्यावे असे श्री जगताप म्हणाले.
समर्थ अभियांत्रिकी विद्यालयाच्या स्थापत्य शास्त्र विभागाच्या वतीने खबडी व परिसरातील उंच टेकड्या,सखोल भाग यांचे सर्वेक्षण करून समतल चर,शेततळे,बंधारा,आनंदवन पाझर तलाव बोटिंग इ.बाबींचा विचार पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास येण्यासाठी होऊ शकतो असे निरीक्षनातून प्रा.भूषण दिघे व प्रा.दिनेश जाधव यांनी सांगितले.यावेळी उंचखडक गावच्या सरपंच सौ.सुवर्णा कणसे,वन विभाग जुन्नर चे जगताप साहेब,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,प्रा.संजय कंधारे,रासेयो समन्वयक प्रा.दिनेश जाधव,प्रा.भूषण दिघे,प्रा.सचिन भालेकर,प्रा.गौरी भोर,प्रा.अश्विनी खटिंग,प्रा.भागवत,बाळकृष्ण झावरे,सुभाष कणसे, विकास कणसे तसेच उंचखडक गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी केलेल्या या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आभार मानले.
COMMENTS