प्रतिनिधी : नवनाथ मोरे आज दि . १०/०१/२०२४ रोजी महाराष्ट्र सर्वच तालुका पंचायत समित्यांवर थाळीनंद आंदोलन करत आहे म्हणून जुन्नर तालुक्यातील प...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
आज दि . १०/०१/२०२४ रोजी महाराष्ट्र सर्वच तालुका पंचायत समित्यांवर थाळीनंद आंदोलन करत आहे म्हणून जुन्नर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी संघटना सिटू संलग्न नेतृत्वाखाली थाळीनाद आंदोलन केले
यानंतर अनेक महिलांनी जोरदार घोषणा देत,गाणी गात सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या यानंतर किसान सभेच्या वतीने गणपत घोडे यांनी मार्गदर्शन केले त्याबरोबर sfi विद्यार्थी संघटनेचे राजेंद्र शेळके यांनी मार्गदर्शन केले या यानंतर लक्ष्मण जोशी सल्लागार ,शुभांगी शेटे यांनी मागण्या बाबत सरकारने काहीही करताना दिसत नाही त्यामुळे जोरदार टीका केली
यामध्ये महिला बाल विकास विभागाने अनेक सेविका मदतनीस यांना कामावरून काढून टाकण्यासाठी नोटीस दिल्या आहेत त्या नोटीसला उत्तरे महिला दिली आहेत
मागण्या , सुप्रीम कोर्ट यांनी अंगणवाडी कर्मचारी बाजूने दिलेला निर्यायाची अंमलबजावणी करणे ,अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्या ,अंगणवाडी सेविका ,मदतनीस २६,०००,१८००० हजार वेतन द्या ,अंगणवाडी पोषण आहार दर्जेदार द्या ,अमृता आहार दर्जेदार मिळाला पाहिजे आदी ११मागण्या राज्य सरकार कडे केल्या आहेत
राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवल्या नाहीत तर आंदोलन तीव्र केले जाईल ,
यावेळी उपस्थित मनीषा भोर (सचिव ) सुशीला तांबे, रुक्मिणी लांडे ,जयश्री भागवत,तुळाबाई घोडे , सीमा कुटे ,गीता शेटे , मीना मस्करे , सविता ताजने , मीरा आरोटे ,साधना मोजाड .इ
COMMENTS