प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर ) घोडेगाव दिं ०८/०१/२०२४ रोजी वार सोमवार सकाळी अकरा वाजता.अन्न नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन तहसिलद...
प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर )
घोडेगाव दिं ०८/०१/२०२४ रोजी वार सोमवार सकाळी अकरा वाजता.अन्न नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन तहसिलदार आंबेगाव व आखिल भारतीय ग्राहक पंचायत आंबेगाव तालुका च्या संयुक्त विद्यमाने २४डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाचे प्रबोधन सप्ताह चे तिसरे पुष्प घोडेगाव येथील शासकीय तंत्र निकेतन घोडेगाव गोनवडी येथे गुंफण्यात आले.
प्रथम स्वामी विवेकानंद व ग्राहक तिर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शासकीय तंत्र निकेतन घोडेगाव च्या वतीने प्रमुख पाहुणे चा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक भोर हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले बी डी काळे महाविद्यालयाचे. मा प्राचार्य इंद्रजित जाधव सरश व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य पुणे.श्री ज्ञानेश्वर माऊली ऊंडे.तंत्रशिक्षण घोडेगाव चे प्राचार्य श्री खेडकर सर. आंबेगाव तालुका संघटक. श्री देविदास काळे.तालुका सचिव. श्री सुदाम भालेराव सर.कृषी समीती प्रमुख. श्री अतुल जी इंदोरे.क्रियाशिल कार्यकर्ते श्री संजयशेठ चिंचपुरे.महिला प्रतिनिधी. श्रीमती आशा थोरात.आकाश ऊंडे.रामदास पालेकर.हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात श्री अशोक भोर म्हणाले.आखिल भारतीय ग्राहक पंचायत हि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन प्रबोधन सप्ताह कायदा पारित झाले. पासुन साजरा केला जातो. ग्राहक पंचायत चा कार्यकर्ते हे विनामुल्य मार्गदर्शन. संस्थेमध्ये व्याख्यान.देण्याचे काम अविरत करत आसतात. ते पुढे म्हणाले. दिल्ली ला एक मुलगी नोकरी चा इंटव्हयु देण्याकरिता गेली होती.ती मुलगी दिल्ली च्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी राहिली होती.ज्या हॉटेलमधे ती मुलगी मुक्काम राहिली होती.तिथे त्या मुलिचे केस वपन करताना अक्षम्य चूक झाली.म्हणुन सदर मुलीला मुलाखत देता आला नाही.त्या मुलिने हाँटेल व्यावसायिकाला तक्रार केली.
त्यांनी त्या मुलीचे पुर्ण बिल माफ केले.पण ती मुलगी गप्प न बसता तीने ग्राहक पंचायत कडे लेखी स्वरुपात तक्रार करुन दाद मागितली.
व तिला एक कोटी रुपये इतकी भरपाई द्यावी म्हणून कोर्टाने आदेश दिला, व आशा अनेक फसव्या जाहिरात ग्राहक पंचायत माध्यमातून बंद करण्यात आल्या व जाहिरात कंपणीला दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतुद केली.
प्रमुख पाहुणे श्री जाधव सर म्हणाले.ग्राहक हि एक चळवळ आसुन ग्राहकाचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आसते.व ग्राहक संरक्षण कायदा चा जन्म स्वरगिय बिंधूमाधव जोशी यांचा प्रयत्नातुन झाला. ग्राहक संरक्षण आधिनियम कलम अंतर्गत सुरक्षा प्रधान करण्यात आली आहे, आणी म्हणून प्रत्येक जण हा जन्मा पासुन ते तिलाजंली पर्यंत हा ग्राहक आसतो, पण आपण फारसा विचार करत नाही.आँनलाईन.आँफलाईन.टेलिशाँपिग.साखळी मार्कटिंग किंवा थेट विक्री आशा कोणत्याही पध्दतीने वस्तू किंवा सेवा विकत घेणार्या ग्राहकांचा यात समावेश आहे.तसेच अन्न भेसळ व दुधा बाबत चिकस्यकता दाखवली पाहिजे.
तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण पुणे चे सदस्य. श्री ज्ञानेश्वर माऊली ऊंडे म्हणाले. आपण ग्राहक आहोत.हे आपल्या आजुन समजले नाही म्हणून आम्ही ग्राहक पंचायत च्या माध्यमातून तुमच्या करिता प्रसार व प्रचार करत आसतो. तरी आपणास विज कायदा काय आहे. हे माहित नाही.ऐखादी डी पी जळाली तर ती २४ तासाच्या आत बदलुन देण्याची शासनाची तरतुद आहे. नाही बदल्ली तर पन्नास रू तासा प्रमाणे दंड द्यावा लागतो. म्हणून तुमच्या मधे जागृती व्हवी म्हणून ग्राहक पंचायत. तसेच पर्यावरण हा म्हत्वाचा विषय आज आपल्या समोर मांडत आहे. आपण व आपला देश प्रगती करत आसताना एक मोठ्या संकटात सापडलेल्या आहे आणी तो म्हणजे प्लास्टिक. आपण जेवन खात नाही तर प्लास्टिक खातो आहे. येणार्या पुढच्या पन्नास वर्षात प्लास्टिक मुळे एक गंभीर समस्या तुमचा आमचा पुढे आसणार आहे.तथापी काळची गरज ओळखून प्लास्टिक वर बंदी घातली पाहिजे...
तसेच शासकीय तंत्रशिक्षण घोडेगाव च्या वतीने निपुन प्राविण्य मिळवलेल्या हुशार विद्यार्थी चां ग्राहक पंचायत आंबेगाव तालुका पदाधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाला तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी व तंत्रशिक्षण घोडेगाव चे विद्यार्थी गण व शिक्षकवृंद हे उपस्थित होते.
सुत्र संचलन श्री हागवणे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका संघटक श्री देविदास काळे यांनी केले.
COMMENTS