प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर ) पेठ दि ६ डिसेंबर स्वराज्य संघाच्या शिवजन्मभुमी शिवनेरी ते धर्मवीर संभाजी जन्मभूमी पुरंदर अशी पालखी स्वर...
प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर )
पेठ दि ६ डिसेंबर
स्वराज्य संघाच्या शिवजन्मभुमी शिवनेरी ते धर्मवीर संभाजी जन्मभूमी पुरंदर अशी पालखी स्वराज्य संघाचे अध्यक्ष हभप बाजीराव महाराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली निघाली असुन पेठ गावात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शामकांत निघोट बाबासाहेब दिघे, दिलीप पवळे, प्रकाश बोराडे, परशुराम गावडे, बबन शिंदे, सुभाष जैद, अशोक राक्षे,संपत शिंदे, पांडुरंग ऊढाणे, नरेंद्र धुमाळ, गजानन बुट्टे,शरद भोजने मुरलीधर धुमाळ व पेठ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाकेश्वर विद्यालय पेठ च्या विद्यार्थ्यांचे झांजपथक मिरवणूकीच्या अग्रभागी होते.
COMMENTS