कल्याण - नगर हायवेवर डिंगोरे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला झालाय. पिकप, रिक्षा, व ट्रक मध्ये काल रात्री १०.३० च्य...
कल्याण - नगर हायवेवर डिंगोरे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला झालाय.
पिकप, रिक्षा, व ट्रक मध्ये काल रात्री १०.३० च्या सुमारास हा अपघात झालाय.
मढ गावातील गणेश मस्करे, वय ३० यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय असून ते काल एक लग्नकार्य आटोपून पत्नी कोमल मस्करे, वय २५,
लहान मुलगी काव्या मस्करे वय ६, मुलगा हर्षद मस्करे वय ४.
व कामगार अमोल मुकुंदा ठोके वय २८, रा. गौळ, यवतमाळ हे ५ जण पिकप मधुन गावी मढकडे निघाले होते.
डिंगोरे जवळ अतिवेग व धोकादायक वळणे यामुळे पिकप चालक गणेश मस्करे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व पिकप विरुध्द लेन मध्ये घुसली.
याचवेळी मुंबई बाजूकडून येत असलेल्या रिक्षावर पिकप धडकली.
या जोरदार धडकेत रिक्षाचालक नरेश नामदेव दिवटे, वय ५४, रा. पेडे परशुराम, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी,
मकरंद मधुकर खिरे, वय ५४, व त्यांचा मुलगा समर्थ मकरंद खिरे व १६, रा. मुंबई उपनगर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षात पुजा विधीचे सामान मिळाले असून रिक्षातील प्रवासी कोणत्यातरी विधीसाठी जात असल्याची माहिती समजली.
रिक्षाला धडक दिल्यानंतर पिकप तशीच पुढे जावुन समोरून येणार्या ट्रकला धडकली. या धडकेत पिकअप चालक गणेश मस्करे, पत्नी कोमल, ६ वर्षाची मुलगी काव्या, ४ वर्षाचा मुलगा हर्षद आणि कामगार अमोल ठोके यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात रिक्षा व पिकअपचा चक्काचूर झाला होता.
ओतुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती हाताळून वाहतुक सुरळीत केली.
ओळख न पटलेल्या मृतदेहांची ओळख पटवून मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करण्यात आले.
या घटनेमुळे मढ गावावर शोककळा पसरली असून गणेश मस्करे यांचे कुटुंबच संपले आहे.
या रस्त्याला डीवायडर बसून, धोकादायक वळणांवर सुरक्षिततेचे उपाय करावे. तसेच काही पिकप, व ईतर वाहन चालक बेशिस्त पणे अतिवेगाने वाहने चालवतात त्यांच्यावर कारवाई मागणी देवराम लांडे यांनी केली.
COMMENTS