प्रतिनिधी : नवनाथ मोरे जुन्नर : निमगिरी (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सोमा सखाराम केदारी यांना आज (दि.२३) रोजी जुन्नर तालुका ...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
जुन्नर : निमगिरी (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सोमा सखाराम केदारी यांना आज (दि.२३) रोजी जुन्नर तालुका गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सोमा केदारी यांची आतापर्यंत झालेली सेवा ही वाखाण्याजोगी आहे. जुन्नर तालुक्यात त्यांनी 37 वर्षे सेवा केलेली आहे. निमगिरी केंद्राच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने तसेच शालेय व्यवस्थापन समिती निमगिरी अध्यक्ष व सचिव यांनी अभिनंदन केले.
तसेच निमगिरी केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, निमगिरी केंद्राचे केंद्रप्रमुख त्रिंबक बगाड, राजुर केंद्राचे बाळासाहेब मोरे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
COMMENTS