मंचर : आज ५/१२/२३ रोजी आंबेगाव तालुका मधील मंचर नगर पंचायत हद्दीत दिव्यांग लोकांच्या विविध अडचणी बाबत अनेक दिवसांपासून दिव्यांग बांधव व सं...
मंचर : आज ५/१२/२३ रोजी आंबेगाव तालुका मधील मंचर नगर पंचायत हद्दीत दिव्यांग लोकांच्या विविध अडचणी बाबत अनेक दिवसांपासून दिव्यांग बांधव व संघटना सातत्याने निवेदन अर्ज व समक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली या मध्ये अनेक दिव्यांग लोकांनचे अनेक प्रश्न मागणी पुर्ण झाली नाही या बद्दल प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक चव्हाण व श्री अरूण शेरकर अध्यक्ष याच्या मार्गदर्शनाखाली आज मंचर नगर पंचायत मध्ये स्थानिक राष्ट्रवादी अपंग सेल मंचर व भा.ज.पा. दिव्यांग विकास संघटना मंचर सर्व दिव्यांग संघटना ऐकत्र येवून यांच्या वतीने मा श्री गोविंद जाधव साहेब मुख्याधिकारी मंचर नगर पंचायत यांची भेट घेऊन दिव्यांग लोकांच्या अडचणीचे निवेदन दिले या मध्ये मंचर नगर पंचायत मध्ये नोंदणी झालेले दिव्यांग लोकांची ऑनलाईन ऑफलाईन यादी, सन २०१६ पासून चा ग्रामपंचायत पूर्वी ची अत्ता ची नगर पंचायत कडून अत्ता पर्यत किती दिव्यांग लोकांना दिव्यांग ५%निधी जमा खर्च करण्यात आला याचे लेखी मिळावे, दिव्यांग लोकांना स्वयंरोजगार सुरू करण्यास २०० स्केअर फूट जागा मिळावी, दिव्यांग लोकांना विनाअट जागा व घरकुल मिळणे, दिव्यांग लोकांना कुटुंब प्रमुखाची अट न लावता घरपट्टीत ५०% सवलत देण्यात यावी, दिव्यांग लोकांना जाॅबकार्ड नोदणी करून दिव्यांग लोकांना झेपेल असे काम रोजगार देवून नगर पंचायत सेवेमध्ये मध्ये समावेश करावा, दिव्यांग व जेष्ठ नागरीक यांना पंचायत कार्यालया मध्ये वर येण्याजाण्यासाठी लिफ्ट ची सोय करण्यात यावी, सन २००० पासून अत्ता पर्यत किती दिव्यांग लोकांना घरकुल व जागा देण्यात आली आहे याची कोणत्या योजनत घरकुल दिले आहे याची नावाची यादी मिळावी, नगर पंचायत मध्ये दिव्यांग लोकांना स्वयंरोजगार व प्रक्षिशण देण्यात यावे व रोजगार सुरू करण्याचा करण्याकरिता बिजभांडवल कर्ज ची व्यवस्था करण्यात यावी , शासनाच्या आदेशानुसार जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात यावे म्हणून श्री राधेश्याम व सर्व संघटना च्या वतीने मंचर नगर पंचायत कडे लेखी मागणी करण्यात आली आहे या वेळी मुख्याधिकारी श्री जाधव साहेब यांनी नगर पंचायत चे दिव्यांग लोकांना देण्यात येणारे विविध उपक्रम व ५%निधी हा प्रत्येक वर्षी देण्यात येत आहे व रीस्तर मंचर हद्दीतील दिव्यांग लोकांनची नोदणी करून घेत आहे व ५%निधी थेट दिव्यांग लोकांच्या बॅकेत जमा करण्यात येत आहे व पुढील काळात नगर पंचायत कडून शासनाच्या विविध योजनाचा लाभ देण्यात येईल असै अश्वासन दिले आहे या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक चव्हाण, श्री अरूण शेरकर अध्यक्ष श्री फरहान अली मीर श्री राधेश्याम संस्था आंबेगाव तालुका, शेहजाद अली इनामदार राष्ट्रवादी अपंग सेल मंचर, श्री प्रशांत बाणखिले अध्यक्ष भा.ज.पा. दिव्यांग विकास संघटना मंचर व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी थोरात, संदेश धनवडे, संगीत काळे, औनअली सय्यद, श्रीमती स्वातीताई शेळके, बाबुभाई राशिनकर, जाकिर इनामदार, बाळु पडवळ उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरूण शेरकर यांनी यांनी लवकरात लवकर नगर पंचायत कडून लेखी उत्तर देण्यात यावे म्हणून सांगितले आहे.
COMMENTS