पुणेः पुणे शहरातील धायरी फाटा येथे आज (शुक्रवार) सकाळी आठच्या सुमारास कचऱ्यात पुरुष जातीचे एक नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सिंह...
पुणेः पुणे शहरातील धायरी फाटा येथे आज (शुक्रवार) सकाळी आठच्या सुमारास कचऱ्यात पुरुष जातीचे एक नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सिंहगड पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत अर्भक ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील एका दुकानासमोर कचरा गोळा करणाऱ्याला आज सकाळी ८ वाजता हे अर्भक कचऱ्यात आढळून आले. त्याने याची माहिती लगेच पोलिसांना दिली. पोलिसांनी अर्भक ससून रुग्णालयात पाठवले आणि या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या घटनेचा आता तपास सुरू केला आहे.
घटनास्थळी अर्भक कुठन आले, ते कोणी टाकले यासाठी पोलिस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत. शिवाय, अर्भक कचराकुंडीत कोणी टाकलं याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येणार आहेत. नवजात अर्भकाला कचऱ्यात टाकल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS