प्रतिनिधी : पंकज सरोदे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील लांडेवाडी या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्य...
प्रतिनिधी : पंकज सरोदे
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील लांडेवाडी या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लांडेवाडी गावचे पीडित कुटुंब शिवाजी दादू लवांडे यांची मुलगी अश्विनी बाळू केसकर यांचा बाळंतपणाच्या वेळी तीन तास रुग्णालय मध्ये गैरहजर असल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तडफडून मृत्यू झाला डॉक्टर नर्स आणि स्टाफ यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे राजकुमार यशवंत (पुणे जिल्हा अध्यक्ष) व सुरेशजी मोहिते साहेब (वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे - महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या आदेशानुसार पंकज भाऊ सरोदे (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष)यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले होते. मंचर पोलीस ठाणे यांनी खोटे आश्वासन देऊन पीडित कुटुंबाची दिशाभूल करून तीन महिने होऊन गेले परंतु कोणतीही कारवाई झाली नाही व कारवाई न झाल्याने लवांडे परिवार यांच्या मृत्यू पावलेल्या मुलीला न्याय मिळत नाही म्हणून मानसिकता बिकट झाली आहे अशा मानसिकता मध्ये लवांडे परिवारातील कोणत्याही व्यक्तीने जीवाचं बरं वाईट केलं तर याच्या जबाबदार कोण ??... लवकरात लवकर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करा अन्यथा बुधवार १७/०१/२०२४ रोजी सकाळी ११:०० वा. "मंचर पोलीस ठाणे विरुद्ध जन आक्रोश आंदोलन" घेणार आहोत आपलं सहकार्य असावा. असे निवेदन मंचर पोलीस ठाणे,डी.वाय.एस.पी खेड, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, व जिल्हा विशेष अधिकारी पुणे. यांना निवेदन देऊन पुणे कार्यालयतील पी.आर.ओ यांच्याशी प्रदीप गौतम साळवे (वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे निरीक्षक) व पंकज सरोदे (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष) यांनी संपूर्ण माहिती देऊन योग्य ती चर्चा करण्यात आली व मंचर पोलीस ठाण्याचे बीट आमदार आढरी यांनी पीडित कुटुंब आशुतोष लवांडे यांना फोन करून धमकी देण्यात आली की प्रदीप गौतम साळवे यांनी सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टीचा उल्लेख केला तर यांना सायबर क्राईम IT च्या अंतर्गत अटक करण्यात येईल, परंतु आपले व्यक्तिगत मत मांडणे हे संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, कारण मंचर पोलीस ठाण्यातून पीडित कुटुंबांना हाकलून लावलं जातं आणि मांडगे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांच्या विरोधात बोललं तर अटक करण्यात येईल परंतु ६ महिने होऊन गेले अश्विनी बाळू केसरकर यांचे डॉक्टर आणि नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे ३ तास तडफडून मृत्यू मृत्यू पावले अशा गुन्हेगारांवर अटक करणे अशक्य ठरते.असे वक्त प्रदीप गौतम साळवे यांनी केले. मंचर पोलीस ठाणे इथे निवेदन देण्यास उपस्थित असलेले : पंकज भाऊ सरोदे (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष)दिपालीताई साबळे (वंचित बहुजन महिला आघाडी आंबेगाव (तालुका अध्यक्ष), संगीता ताई मिरके (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष), साधू शेठ लवांडे (तालुका प्रमुख सल्लागार), सुरेश दादा रोकडे (तालुका सचिव), रतन साबळे (सदस्य) संदीप मिरके (सदस्य), प्रदीप गौतम साळवे (वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन)
COMMENTS