विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ, जुन्नर संचलित श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ, जुन्नर संचलित श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर व डायमंड पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस भव्य ग्रंथ प्रदर्शन व विक्री हा उपक्रम आयोजित केलेला आहे. सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव सुभाष शंकरराव कवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर प्रदर्शन हे दि. २९ डिसेंबर २०२३ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ९.०० वा. ते सायंकाळी ८.०० वा. पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे, अशी माहिती डायमंड पब्लिकेशनचे प्रकाशक श्री. दत्तात्रय पाष्टे यांनी दिली . या प्रदर्शनासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे व विश्वस्त मंडळ तसेच इतर उपस्थित मान्यवरांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून डायमंड पब्लिकेशनचे प्रकाशक श्री दत्तात्रय पाष्टे, संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी. प्रा. विलास भगवंत कुलकर्णी,प्राचार्य डॉ. महादेव भानुदास वाघमारे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती प्रतिभा लोढा व महाविद्यालयाचे प्रभारी ग्रंथपाल सौ.वंदना अनिल चव्हाण हे उपस्थित होते.
COMMENTS