अमीन शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी दिनांक 23/डिसेंबर 2023 आज रोजी शेगाव ते जळगाव जामोद बस क्रमांक MH 40N 8712 या क्रमांकाची असून शेगाव ते ...
अमीन शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
दिनांक 23/डिसेंबर 2023 आज रोजी शेगाव ते जळगाव जामोद बस क्रमांक MH 40N 8712 या क्रमांकाची असून शेगाव ते जळगाव जामोद जात असताना 1ते 2 वाजे च्या दरम्यान कालखेड फाट्याजवळ (वरवट रोडवर) अचानक कंडेक्टर साईट चे चक्क्या चे बेरिंग फुटल्या मुळे मागील दोन्ही चक्के वेगाने पळाले असून मोठ्या कृपेने एसटी कंडक्टर ड्रायव्हर सह प्रवाशांचे काही मोठा अपघात झाला नाही त्यामुळे प्रवासी मध्ये खूप मोठी धावपळीची अवस्था निर्माण झाली होती परंतु कोणत्याही प्रवाशांची जीवाची हानी झाली नाही परंतु महामंडळाच्या दुर्लक्ष पणा मुळे हाऊजिंग मधील बेरिंग फुटले व गाडीचा भार एक्सेल वर आल्यावर एक्सल चे दोन तुकडे झाल्याने दोन्ही चक्के वावरात जाऊन पडली बस एकदम जोराने रोडवर आदळली सर्व प्रवासांच्या मनात एकच विचार आला की आपण मेलो,असी खळबळ उडाली,या दुर्घटनेचे बस स्थानक वरील गॅरेज मेकॅनिक व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पणा मुळे आज रोजी प्रवाशांचे व चालक वाहक यांचे सुद्धा खूप मोठे नुकसान झाले असते त्याला जबाबदार फक्त मेकॅनिक संबंधित व बस स्थान चे अधिकारी यांचे दुर्लक्ष म्हणावे लागेल, या दुर्घटनेच्या पहीले आगाराच्या चालक व वाहक यांच्या संघटने च्या वतीने मागे काही दिवसां पूर्वी दि,10/10/23 ला पोलिस ठाणे शेगाव येथे तक्रार देण्यात आली होती की असे भंगार गाड्या चालवायला देण्यात येतात ज्या मध्ये अपघात झाल्यास चालक व वाहक व कर्मचारी जवाबदार राहणार नाही, विदर्भ एस, टी, कामगार संघटना च्या वतीने तक्रार निवेदन दिलेल्या दिनांक,1)दि,13/10/23 ला जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा
2) 25/11/23 विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा, यांची मनात कोणती ही भिती न ठेवता शेगाव आगर चे मेकॅनिक व अधिकारी यांचे दुर्लक्ष, पुढे काय होणार आहे बस मध्ये प्रवास करायचे का नाही जनतेच्या मनात विचार येत आहे
COMMENTS