प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ व सम...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जुन्नर तालुका विज्ञान प्रदर्शन व मेळावा सन २०२३-२४ ची सहविचार सभा नुकतीच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके सचिव विवेक शेळके विश्वस्त वल्लभ शेळके, ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली ताई आहेर तसेच पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे,जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल मुख्याध्यापक संघाचे तबाजी वागदरे,गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे व तालुक्यातील विज्ञान शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या सहविचार सभेची सुरुवात करण्यात आली.
सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन मुख्य विषयाला अनुसरून आरोग्य,जिवन,शेती/कृषी,दळणवळण आणि वाहतूक व संगणकीय विचार असे पाच उपविषय निर्धारित करण्यात आल्याची माहिती जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी दिली.
हे प्रदर्शन २ व ३ जानेवारी २०२४ रोजी समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे घेण्यात येणार आहे.
विज्ञान प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण गोष्टी शिकण्यासाठी ची एक संधी असल्याचे गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे मॅडम म्हणाल्या.
या दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये प्रकल्प स्पर्धेसोबतच संगणकीय सादरीकरण स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, भित्तिपत्रक (पोस्टर मेकिंग) स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा, कौन बनेगा विज्ञानपती स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.त्याचप्रमाणे आगस्त्या फाऊंडेशन, आयुका द्वारे दिवसभर विज्ञानवाहिनी मार्फत विज्ञान खेळणी प्रात्यक्षिक आणि सायंकाळी दुर्बीनी द्वारे अवकाश दर्शन देखील दाखविण्यात येणार आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असल्याने यामध्ये दुर्मिळ नाणे व शस्त्रास्त्रे,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन, अंधश्रद्धा निर्मूलनपर जादूचे प्रयोग,न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड चे माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.संवाद विज्ञान लेखकांशी, गणितीय गमती-जमती व गप्पा गणित संशोधकांशी या विषयांवर आधारित तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान देखील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी प्रास्ताविक प्रा.रतिलाल बाबेल यांनी तर आभार प्रा. प्रदिप गाडेकर यांनी मानले.
COMMENTS