सुराळे : जुन्नर तालुक्यातील सुराळे ग्रामपंचायत हद्दीत जागतिक दिव्यांग दिन निमीत्ताने कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सुराळे ग्रामपंचायतची ...
सुराळे : जुन्नर तालुक्यातील सुराळे ग्रामपंचायत हद्दीत जागतिक दिव्यांग दिन निमीत्ताने कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सुराळे ग्रामपंचायतची ग्रामसभा आयोजित केली होती, या मध्ये सुराळे ग्रामपंचायत हद्दीत दिव्यांग लोकांना आमंत्रित करण्यात आले होते सर्व दिव्यांग लोकांना त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक चव्हाण यांनी उपस्थित दिव्यांग विधवा परित्यक्ता अनाथ निराधार सोडचिठ्ठी झालेले लोकांना त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी आपले हक्कासाठी संस्थेचे काम या बद्दल माहिती व शासनाच्या विविध योजना याची माहिती दिली तसेच ग्रामपंचायत हद्दीत दिव्यांग लोकांना कुटुंबप्रमुखाची अट न लावता घरपट्टीत ५०%सवलत देण्यात यावी व ग्रामसंघ मार्फत दिव्यांग लोकांचा बचत गट स्थापन करून सहभागी करून घ्यावेत म्हणून सांगितले.
या वेळी उपसरपंच श्री सचिन भाऊ चव्हाण यांनी दिव्यांग लोकांना त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी व घरपट्टीत ५०%सवलती ग्रामसभेत ठराव करून देण्यात येईल असै अश्वासन दिले आहे या वेळी उपस्थित मान्यवरांच्या व सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते दिव्यांग लोकांना पालव पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी श्री राधेश्याम सुराळे ग्रूप च्या वतीने ग्रामपंचायतीला पाण्याचे जार व ग्लास भेट देण्यात आले.
यावेळी सरपंच निता घोगरे, उपसरपंच सचिन भाऊ चव्हाण, ग्रामसेवक आझादे मॅडम, श्री राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अरूण शेरकर अध्यक्ष, राहुल मुसळे उपाध्यक्ष, संस्थेचे पश्चिम विभाग अध्यक्ष सौरभ मातेले, बन्सी चतुर, सयाजी मातेले, भास्कर मातेले, अंकुश चव्हाण, बबन मातेले, प्रसाद मातेले, शिवानी शेटे, दिलीप शिंदे, जिजाभाऊ चतुर, अनविता शेटे, जयसिंग मातेले, संजय केदारी, उज्ज्वला चव्हाण, अनिल शेटे, आर्यन केदारी, व दिव्यांग व ग्रामस्थ उपस्थित होते या वेळी सौरभ मातेले यांनी ग्रामपंचायत सुराळेचे सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक सर्व ग्रामस्थांचे दिव्यांग लोकांना सत्कार केला या बद्दल धन्यवाद आभार मानले.
COMMENTS