प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे. सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स ग्रूप चा मुख्य उद्देश ट्रेकिंग सोबत स्वच्छता अभियान आणि पारंपरिक व सांस्कृतिक वारस...
प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे.
सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स ग्रूप चा मुख्य उद्देश ट्रेकिंग सोबत स्वच्छता अभियान आणि पारंपरिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचा आणि सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याच्या हेतू आहे. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी भारतीय संस्कृतीतील दसरा-दिवाळी-गुढीपाडवा यांसारखे सण आपल्या मायभूमीतील गड किल्ल्यांवर जाऊन तेथील वास्तू पूजन, दुर्ग पूजन व दीपप्रज्वलन करून साजरे केले जातात.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिवाळीचे अवचित्य साधून दिवाळी पहाट व दिपोत्सव कार्यक्रमास सहा वर्षे पूर्णत्वास होत असताना किल्ले शिवनेरी जुन्नर (शिवजन्मभूमी) मध्ये सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स जुन्नर या संस्थेच्या माध्यमातून दिवाळी पहाट,दिपोस्तोव,सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रम सादर करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पहाटे ०५.३० ते ०६.३० या दरम्यान छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान व आजूबाजूचा परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला.
COMMENTS