पुणे : D.B.A अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य रत्नागिरी भारत ( रजि ) पुणे जिल्हा आयोजित राज्यस्तरीय कविसंमेल...
पुणे : D.B.A अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य रत्नागिरी भारत ( रजि ) पुणे जिल्हा आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन २०२३ हे रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक मनोज जाधव सर, कविसंमेलनाध्यक्ष कवी गीतकार, गझलकार संगितकार विजय वडवेराव, तर स्वागताध्यक्ष जयद्रथ आखाडे हे होते.
सकाळी १०.३० मि. कविसंमेलनाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करत मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वन करून कार्यक्रमाचे स्वागत जयद्रथ आखाडे यांनी केले तर या संस्थेच्या सहसंस्थापिका व संपादिका भावना खोब्रागडे यांनी कार्यक्रमात स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाच्या आजपर्यंतच्या वाटचालीसंदर्भात प्रास्ताविक मांडले, तसेच संजय मोरे ( माजी जनसंपर्क अधिकारी पुणे ) दादासाहेब सोनवणे ( माजी दलित संघप्रमुख पुणे ), डॉ.शैलेंद्र भगणे ( कवी, साहित्यिक औरंगाबाद ), सुभाष उबाळे ( धम्मसेवक नालंदा बुध्दविहार पुणे ) या मान्यवरांनी कविसंमेलनात आपले मनोगत व्यक्त केले व कविसंमेलनाकरिता शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष मनोज जाधव सर यांनी कविसंमेलनाला लाभलेले अध्यक्ष विजय वडवेराव यांचे आभार मानले व कविसंमेलनाकरिता आल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. डि.बी.ए ची वाटचाल आजपर्यंतचा लेखाजोखा व आलेल्या कवींना शुभेच्छा देऊन डि.बी.ए पुणे जिल्हा कमिटीचे विशेष आभार मानत सर्वांनीच या कविसंमेनाकरिता अहोरात्र झटून कविसंमेलन व्यवस्थितरित्या पार पाडल्याबद्दल शुभेच्छा देत भावना खोब्रागडे यापुढे डि.बी.ए.च्या संस्थापिका म्हणून काम करतील असे बोलताना त्यांनी सांगितले.
यानंतर डि.बी.ए. प्रकाशन च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या २ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा करण्यात आला.
यानंतर मान्यवरांचा पुस्तक, सन्मानपत्र, मानाचा पट्टा, ट्रॉफी देऊ सन्मान करण्यात आला.
यानंतर कविसंमलेनाला सुरूवात झाली कविसंमेलनात आलेल्या सर्वच कवींनी अतिशय छाण सामाजिक व विविध विषयांवर कवितांचे सादरीकरण केले, यानंतर कविसंमेलनाध्यक्ष विजय वडवेराव यांनी कविसंमेलनाला शुभेच्छा देत डि.बी.ए. महाराष्ट्र व पुणे जिल्हा कमिटीला शुभेच्छा दिल्या व मनोज जाधव सरांनी असेच नवनविन उपक्रम राबवावेत व नविन कवी घडवावेत अशा भावना व्यक्त केल्या सर्वांचे त्यांनी भरभरून अभिनंदन केले व शेवटपर्यंत प्रत्येक कवींच्या कवितांना दाद दिली.
दुपारी स्नेहभोजन करण्यात आले, सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचे आभार वैशाली लांडगे जिल्हाध्यक्ष यांनी मानले यानंतर सर्व कवींना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला, या प्रसंगी सहकार्य पुणे जिल्हा कमिटी वैशाली लांडगे जिल्हाध्यक्षा, संतोष मोहिते उपाध्यक्ष, प्रा सतिश शिंदे सचिव, प्रतिभा किर्तिकर्वे सहसचिव, नंदिनी सुकाळे ग्राफिक्सकार, प्रतिमा काळे संपर्क प्रमुख भाग्यश्री आखाडे, दिक्षा कसबे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सतिश शिंदे व उषा खोपडे यांनी केले.
COMMENTS